या व्हिडिओने केली कपिल शर्माची पोलखोल, टेलिप्रॉम्पटर वापरून करतो कॉमेडी

घराघरात हमखास पाहिला जाणारा शो म्हणजे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा' (Comedy Nights With Kapil Sharma). कपिल शर्माचे विनोद, त्याचे सेन्स ऑफ ह्युमर यावर प्रेक्षक खळखळून हसतात.

या व्हिडिओने केली कपिल शर्माची पोलखोल, टेलिप्रॉम्पटर वापरून करतो कॉमेडी

घराघरात हमखास पाहिला जाणारा शो म्हणजे ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ (Comedy Nights With Kapil Sharma). कपिल शर्माचे विनोद, त्याचे सेन्स ऑफ ह्युमर यावर प्रेक्षक खळखळून हसतात. अगदी बाहेरच्या देशातूनही लोक हा शो बघायला येतात. कोणताही सिनेमा असो त्याचे प्रमोशन कपिल शर्माच्या शो मध्ये झालेच पाहिजे असा हट्ट असतो. पण आता कपिलची एका युझरने पोलखोल केली आहे ज्यामुळे तो चांगलाच ट्रोल होतोय. विनोदांचा बादशाह कपिल शर्मा सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. कपिल ऑन द स्पॉट विनोद तयार करतो आणि लोकांना हसवतो, असं त्याच्या चाहत्यांना वाटत होतं, पण एका नेटकऱ्याने त्याचा टेलिप्रॉम्पटरवर पाहून विनोद करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि कपिल ट्रोल होऊ लागला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अशातच कपिलच्या चाहत्यांनी त्याची बाजू घेतली, तर कपिल ज्यांना आवडत नाही, त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. पण कपिलला सपोर्ट करणाऱ्यांची संख्या जास्त दिसत होती. लोकांनी कपिलचे कौतुक केले आणि एवढ्या मोठ्या शोचं शूटिंग करताना टेलिप्रॉम्प्टर गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तो टेलिप्रॉम्पटरवर स्क्रिप्ट वाचत असल्याचं दिसतंय. स्क्रीन झूम करून हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यात सेटच्या खिडकीवर टेलिप्रॉम्प्टरची झलक दिसते. त्यावर स्क्रिप्ट लिहिली आहे आणि ते वाचून कपिल शूट करताना दिसतोय. व्हिडीओमध्ये कपिलला टेलिप्रॉम्प्टर वापरताना बघून युजरने आश्चर्य व्यक्त केलंय. ‘मला वाटायचं की कपिल स्वतःहून विनोद तयार करतो आणि बोलतो, पण तो माझा भ्रम होता, कपिलचे डायलॉग आणि जोक्स आधीच लिहिलेले असतात, तो टेलिप्रॉम्प्टर वापरून ते बोलतो,’ असं त्या युजरने म्हटलं होतं.

‘न्यूज अँकरदेखील बातम्या वाचताना टेलिप्रॉम्पटरची मदत घेतात’, ‘शूटिंग करताना डायलॉग विसरू नये, म्हणून त्याने टेलिप्रॉप्टरची मदत घेतली होती’. ‘जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग करत असता, तेव्हा टेलिप्रॉम्पटर लागतंच, ऐनवेळी काही चुकलं तर मेहनत वाया जाऊ शकते, कदाचित ही प्रोसेस तुला माहित नसेल, म्हणून तू असं बोलतोय’. ‘अशा चुका काढायला तुमच्यासारख्या लोकांकडे खूप वेळ आहे,’ अशा प्रकारच्या कमेंट्स कपिलच्या चाहत्यांनी त्या व्हिडीओवर केल्या आहेत. तसेच दुसरा म्हणाला आहे, ही एक आवश्यक प्रक्रिया आहे, लाईव्ह परफॉर्मन्स करताना चूक होऊ नये म्हणून खबरदारीसाठी याचा वापर होतो अशी कमेंट एकाने केली आहे. भाऊ, ही तर फक्त कॉमेडी आहे इथे तर आपले पंतप्रधानही टेलिप्रॉम्पटरचा वापर करतात, अशी कमेंट एकाने केली आहे.

हे ही वाचा:

विरोधकांनी केलेल्या नोटबंदीच्या घेऱ्यातून मोदींची सुटका | SC Demonetisation Judgement | PM Modi

Watch Video नवीन वर्षाच्या सुरुवातीला निक जोनसने केला भन्नाट व्हिडीओ शेअर, बॅकग्राऊंडमधील हिंदी गाणं ऐकून चाहते झाले थक्क

विकृत बोलून वाद निर्माण करणं जबाबदार पुढाऱ्यांना शोभत नाही, अजित पवारांच्या वक्तव्यावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version