ब्रह्मास्त्र प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल

ब्रह्मास्त्र प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाचा ‘हा’ व्हिडिओ व्हायरल

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही काळापासून बॉलीवूड चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर जी स्थिती आहे, त्यात अयान मुखर्जीचा ‘बृह्मास्त्र’ मोठ्या पडद्यावर काय जादू निर्माण करू शकतो, हे पाहावे लागेल. त्यामुळेच आलिया-रणबीरसह चित्रपटातील बाकीचे स्टार्सही सध्या ‘ब्रह्मास्त्र’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. इव्हेंट्सशिवाय सोशल मीडियावरही चित्रपटाचे सातत्याने प्रमोशन केले जात आहे. प्रत्येक दिवसागणिक, आलिया आणि अयान यांचे चित्रपटासंबंधीत नवीन व्हिडिओ सतत शेअर करत असतात. आता आलियाने आज एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये चित्रपटाचे शूटिंग दिसत आहे.

हेही वाचा : 

सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य बनवण्यासाठी मुंबई महानगरपालिका करणार २५० कोटींचा खर्च

आलियाने शेअर केलेला व्हिडिओ हा चित्रपटातील अवघड सीन्स कसा शूट करण्यात आला आहे हे दाखवणारा सेट व्हिडिओ आहे. तुम्हाला हे पाहून आश्चर्य वाटेल की ट्रेलरमध्ये घराबाहेर दिसणारे दृश्य प्रत्यक्षात घरामध्ये शूट केले गेले आहे, तेही दोरीने बांधलेले आहे. या व्हिडिओमध्ये अॅक्शनसोबतच रोमान्सही आहे. तुम्हीही पहा हा धक्कादायक व्हिडिओ.

जाणून घ्या ‘झलक दिखला जा’ च्या प्रत्येक एपिसोडसाठी सेलिब्रिटी घेणार किती मानधन

अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. रणबीर-आलिया पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र काम करत आहेत. त्याचबरोबर इतर चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या ट्रेंडमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ला सोशल मीडियावर खूप पाठिंबा मिळत आहे. चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगही कमालीचे दिसून येत आहे. प्रमोशनदरम्यानही आलिया आणि रणबीरला खूप प्रेम मिळत आहे. याआधी नुकताच रणबीरचा ‘शमशेरा’ रिलीज झाला जो काही खास दाखवू शकला नाही.

Exit mobile version