spot_img
Monday, September 16, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोरंजन सृष्टीतील ‘या’ कपलने व्यक्त केला संताप… जाणून घ्या सविस्तर

स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत हल्लीच ‘मिहिका’ म्हणून एन्ट्री केलेली मराठी अभिनेत्री ‘अमृता बने’ सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. तिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ऑनलाईन पद्धतीने ऑर्डर केलेल्या पदार्थांमध्ये भेसळ असल्याची शक्यता सांगितली. तिने स्वतःचा वैयक्तिक अनुभव इंस्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अमृता बने सह तिचा नवरा शुभंकर एकबोटेदेखील या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सफरचंदाच्या सालीवर वॅक्ससारख्या पदार्थाचा एक थर दिसून येतोय. तो नेमका काय आहे हे सुद्धा कळत नसल्याची माहिती तिने दिली आहे. इंस्टाग्राम स्टोरीचा व्हिडिओ शेअर करताना #thinkbeforeeating हा हॅशटॅग वापरला आहे. त्याचबरोबर ऑनलाईन डिलिव्हरी करण्याऱ्या अँपला सुद्धा टॅग करून FSSAI ला देखील मेन्शन केले आहे.

अमृता बने हिने तिच्या सोशल मीडिया म्हणजेच इंस्टाग्राम स्टोरीमध्ये असं सांगितलं आहे की, ”ऑनलाइन मागवलेले सफरचंद शुभंकर मला कापून देत होता. तेव्हा जे काही घडलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायलाच हवं. कोणत्याही प्रकारे कंटेट क्रिएशनचा किंवा खोट्या प्रकारे व्हिडिओ बनवण्याचा हा प्रकार नाहीये. मी शुभंकरला म्हटलं की, एखादा आजारी माणूस फक्त पाण्याखाली धुवून हे फळ खाईल. हे काय आहे नेमकं, तेही कळत नाहीये. मेणाचा थर आहे की अजून काहीतरी, हेदेखील समजत नाहीये. आजारी असताना हे कसं खायचं हेच कळत नाही. Eat Apple A Day Keeps Doctor Away’ अशी म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.पैसे खर्च करून पण तुम्हाला भेसळ मिळणार नाही याची शाश्वती कशी द्यायची, हे आम्हाला फक्त तुमच्या पर्यंत पोहचवायचं होत, काळजी घ्या. ” त्यावर तिचा नवरा शुभंकर हेही म्हणाला की, ” असे सफरचंद खाऊन तुम्हाला रोज डॉक्टरची गरज पडू शकेल.”

हे ही वाचा:

“आदिवासी भागातील PESA कायद्यांतर्गत भरतीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक”; Cm Eknath Shinde यांची ग्वाही

Congress ला मोठा मिळणार फटका; JItesh Antapurkar करणार BJP मध्ये एन्ट्री

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss