‘ती माझी प्रेमकथा’ लवकरच आपल्या भेटीला

अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धाकीते ही नवी जोडी 'ती माझी प्रेमकथा' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत

‘ती माझी प्रेमकथा’ लवकरच आपल्या भेटीला

ती माझी प्रेमकथा

प्रेम म्हणजे प्रत्येकासाठीच एक जिव्हाळ्याचा विषय आणि प्रत्येकाच्या मनातील एक हळवा कोपरा. आयुष्याच्या एखाद्यातरी वळणावर प्रत्येकजण माणूस हा कधी ना कधी प्रेमात पडताच आणि हेच प्रेम जर टिकवायचं असेल तर एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे विश्वास, मात्र प्रेमींमधील हा विश्वास डगमगला तर त्या प्रेमाचे पुढे काय होते हे ‘फिल्मी टाईम प्रोडक्शन’ सह आणि ‘कनिष्क अँड त्रिगेश एंटरटेनमेंट’ सोबत निर्माते राजकुमार देगलूरकर, ओमप्रकाश बुकव्वर निर्मित ‘ती माझी प्रेमकथा’ या प्रेममय चित्रपटातून येत्या 30 सप्टेंबरला प्रेक्षकांसमोर येणार आहे. एकुणच हा चित्रपट फक्त एक प्रेमकथा नसून आजच्या तरूण पिढीला एक मोठा संदेश आहे. नुकतेच या चित्रपटाचे रोमँटिक पोस्टर प्रेक्षकाच्या भेटीस आले आहे.

अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धाकीते ही नवी जोडी ‘ती माझी प्रेमकथा’ या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. एकंदरीत हा नवा सिनेमा एक नवी प्रेमकथा आणि प्रेमाचे नवे पैलू प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. त्यामुळे या चित्रपटामधील पद्मिनी आणि तुषारची लव्हेबल केमिस्ट्री पाहणं प्रेक्षकांसाठी औसुक्याच ठरणार आहे. नवकलाकारांसह या चित्रपटाला आत काही अनुभवी कलाकारांची देखील जोड असणार आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये ही झळकणार आहेत, तर भोंगा फेम कपिल कांबळे या चित्रपटात तुषारच्या मित्राच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक सूर्या यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि स्क्रीनप्ले अशा तीनही जबाबदाऱ्या उत्तमरित्या पेलवल्या आहेत. या चित्रपटाच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची जबाबदारी कपिल जोंधळे यांनी सांभाळली आहे. तर या रोमँटिक चित्रपटाच्या संगीताची धुरा राजवीर गांगजी याने सांभाळली आहे.

एकमेकांवरील प्रेमाची कबुली देत प्रेमाच्या बंधनात अडकत गेल्यानंतर काही कालावधीने संशय आणि अविश्वासाने मारलेली उडी त्या प्रेमाचा अंत करते की, एकमेकांवरील प्रेम नात्यातील अविश्वासाला पराभव करते हे ‘तू माझी प्रेमकथा’ या चित्रपटात पाहणे रंजक ठरणार आहे. सिद्धू आणि रेणूची जोडगोळी या चित्रपटात एक आगळी वेगळी कथा मोठ्या पडद्यावर आणणार आहे. येत्या 30 सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

हे ही वाचा:

वीकेंडसाठी घराबाहेर जात आहात ?, तर हि बातमी नक्की वाचा 

 

Exit mobile version