Doctor Ji Movie : आयुष्मान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित, पहा स्त्रीरोग तज्ज्ञचा संघर्ष

Doctor Ji Movie : आयुष्मान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित, पहा स्त्रीरोग तज्ज्ञचा संघर्ष

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयुष्मानच्या ‘डॉक्टर जी’ या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ‘डॉक्टर जी’चा ट्रेलर पाहताना खळखळून हसला येत आहे. आयुष्मानचा हा चित्रपट नेहमीप्रमाणे कॉमेडीसोबत सामाजिक परिस्थितीही दाखवत आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत रकुल प्रीत सिंह दिसणार आहे. आयुष्मान खुराना ‘डॉक्टर जी’ मध्ये स्त्रीरोग तज्ञाची भूमिका साकारत आहे.

हेही वाचा : 

Paithan : मुख्यमंत्र्यांना गावात आणण्यासाठी एका तरुणाने जिवाच्या आकांताने केले प्रयत्न

आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटाचा ट्रेलर काही वेळापूर्वी रिलीज झाला आहे. सुमारे 2.55 सेकंदांचा हा ट्रेलर व्हिडिओ तुम्हाला पोट धरून हसायला लावू शकतो. चित्रपटात आयुष्मान खुरानाला ऑर्थो डॉक्टर व्हायचे होते, पण तो स्त्रीरोगतज्ञ बनतो. पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने अनेक लोक त्याच्यावर उपचार करण्यास नकार देतात. एक पुरूष स्त्रीरोगतज्ज्ञ असल्यामुळे त्याला आपल्या व्यवसायात किती संघर्ष करावा लागतो हे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. अनेक लोक त्याची पुन्हा पुन्हा खिल्ली उडवताना दिसतात. त्याचबरोबर रकुल प्रीत सिंह देखील या चित्रपटात लेडी डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील आयुष्मानचे डायलॉग्सही जबरदस्त आहेत, जे ऐकून तुम्ही स्वतःला हसू आवरत नाही.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकारणी ईडीचा मोठा खुलासा, माजी मुख्यमंत्र्यांचा हात?

आता पर्यंत आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती

‘विकी डोनर’, ‘नौटंकी साला’ ‘हवाईजादा’, ‘दम लगा के हैशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘दम लगा के हैशा’, ‘अंधाधुंद’, ‘अनेक’ या चित्रपटातील आयुष्मानच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. स्टार प्लसचा शो ‘जस्ट डान्स’मध्ये त्याने सूत्रसंचालन केले. २००४ मध्ये आयुष्मान खुराना एमटीव्हीच्या ‘रोडीज’ शोमध्ये झळकला होता. या शोचे विजेतेपदही त्याने पटकावले होते.

२० सप्टेंबरपासून कोकणकन्या एक्सप्रेस कात टाकणार

Exit mobile version