खिलाडी अक्षयचा “कठपुतळी” चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' हा सिनेमा सिनेमागृहात सर्वत्र प्रदर्शित झाला परंतु बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा त्याची जादू दाखवण्यात थोडा कमी पडला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यातदेखील कमी पडला आहे.

 खिलाडी अक्षयचा “कठपुतळी” चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Bollywood actor Akshay Kumar) ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) हा सिनेमा सिनेमागृहात सर्वत्र प्रदर्शित झाला परंतु बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा त्याची जादू दाखवण्यात थोडा कमी पडला आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यातदेखील कमी पडला आहे. परंतु आता खिलाडी अक्षय कुमारचा आगामी ‘कठपुतली’ (Cuttputlli) सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. अक्षय कुमारचा हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

येत्या २ ऑक्टोबर रोजी ‘कठपुतली’ हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे. परंतु हा चित्रपट सिनेमा गृहात प्रदर्शित न होता ओटीटी प्लॅटफॉर्म्स वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये खिलाडी अक्षय कुमारसह रकुल प्रीत सिंहदेखील दिसून येणार आहे. तसेच नुकताच अक्षय कुमारने सोशल मीडियावर या सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित केला आहे आणि त्यामध्ये ३ खून, १ शहर, एक पोलिस आणि एका सीरियल-किलरची सुटका ! असे कॅपशन त्याने दिले आहे तर टीझर शेअर शेअर करत अक्षय म्हणाला, “हा खेळ युक्तीने खेळायचा आहे. या खेळात तुम्ही आणि मी कठपुतली आहोत” परंतु त्याच्या या कॅपशनमागे नक्की त्याला काय म्हणायचे आहे हे संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल

तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय कुमारची झलक दाखवण्यात आली आहे. या सिनेमात अक्षय कुमार एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. प्रेक्षकांना थरार नाट्य पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट तमिळ ‘रत्सासन’ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. तसेच यामध्ये एका सायको किलरची कथा आहे जो शाळकरी मुलींची अपहरण करतो. आणि त्यांना मारतो. तर हा सर्व नक्की काय प्रकार आहे हे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल. तर रंतीत एम तिवारीने यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

या सिनेमा पाठोपाठ अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात खिलाडी कुमार ने जॅकलीन फर्नांडीज आणि नुसरत भरुचा सोबत दिसून येणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने आतापर्यंत अनेक चित्रपट केले आहेत आणि बहुतेक चित्रपटामधून त्याने ॲक्शन भूमिका आणि सामाजिक संदेश देण्याचे पात्र साकारले आहे. उदारणार्थ पाहिले तर पॅड मॅन या चित्रपत्रांमधून एक सामाजिक संदेश दिला आहे तर सूर्यवंशी, हॉलिडे यासारख्या चित्रपटांमध्ये ॲक्शन रोल करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तर आगामी चित्रपट कठपुतली हा प्रेक्षकांना किती पसंतीस पडतो हे पाहणे गरजेचे ठरेल

हे ही वाचा :-

सोमालियातील मोहादिशू येथे २६/११ सारखा हल्ला, हॉटेलमध्ये उपस्थित सर्व दहशतवादी ठार

‘आम्ही जिथे उभे राहतो तिथून रांग सुरु होते’ – आशिष शेलार

Exit mobile version