‘गांधी-गोडसे एक युद्ध’चा ट्रेलर रिलीज, या दिवशी चित्रपट होणार थिएटरमध्ये दाखल

राजकुमार संतोषी दिग्दर्शित, गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटातून तनिषा संतोषी आणि अनुज सैनी हे अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

‘गांधी-गोडसे एक युद्ध’चा ट्रेलर रिलीज, या दिवशी चित्रपट होणार थिएटरमध्ये दाखल

प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार संतोषी त्यांच्या आगामी ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. या चित्रपटाद्वारे ते नऊ वर्षांनी दिग्दर्शनाकडे परतणार आहेत. प्रदीर्घ प्रतिक्षा संपवून निर्मात्यांनी बुधवारी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला, ज्यामध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या विरोधी विचारसरणीची लढाई दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

याआधी रिलीज झालेला चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आणि त्यांना विचार करायला भाग पाडणारा होता. त्यामुळे प्रेक्षक गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर हा बहुचर्चित ट्रेलर आज रिलीज झाला आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना गांधी आणि गोडसे यांच्यातील विचारधारेच्या युद्धाची झलक देतो आणि या दोन प्रतिष्ठित पात्रांपैकी कोण हे युद्ध जिंकेल याची उत्सुकता देखील निमार्ण करतो. गांधी गोडसे एक युद्ध ह्या चित्रपटाची कथा काल्पनिक जगाभोवती फिरते जिथे महात्मा गांधी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यातून वाचले आणि नंतर तुरुंगात नथुराम गोडसेला भेटले. त्यांच्यातील संभाषणामुळे त्यांच्यात जोरदार वादविवाद होतात, हे देखील दाखवण्यात आले आहे.

चिन्मय मांडलेकर आणि दीपक अंतानी हे गोडसे आणि गांधी यांची पडद्यावर भूमिका साकारताना दिसणार आहेत. गांधी आणि गोडसेच्या या विरोधाभासी दुनियेत प्रवेश करण्यासोबतच प्रेक्षकांना स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाच्या जगाचा साक्षीदारही होता येणार आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित, गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटातून तनिषा संतोषी आणि अनुज सैनी हे अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार आहेत. यात आरिफ झकेरिया आणि पवन चोप्रा यांच्याही भूमिका आहेत. १९४७-१९४८ दरम्यान सेट केलेला हा चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हे ही वाचा:

‘MI VASANTRAO’ ऑस्करच्या यादीत, मराठी चित्रपटाचे नाव झळकले

Golden Globes 2023 Winners List, सातासमुद्रा पार होणार भारतीय चित्रपटाचा सन्मान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version