सॅनिटरी नॅपकीनवरील श्रीकृष्णाच्या फोटोमुळे ‘मासूम सवाल’ होतोय ट्रोल

वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अजून एक सिनेमा म्हणजे येत्या ५ ऑगस्टला प्रदर्शित होणारा 'मासूम सवाल' हा सिनेमा

सॅनिटरी नॅपकीनवरील श्रीकृष्णाच्या फोटोमुळे ‘मासूम सवाल’ होतोय ट्रोल

Masoom Sawaal

हल्लीच्या काळात सिनेमांचे पोस्टर किंवा मग त्यांच्या नावांमुळे हिंदी सिनेमे असोत वा मराठी सिनेमे प्रत्येक सिनेमा हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. अशा सिनेमांचं एक ताजं उदाहरण म्हणजे ‘सत्यनारायण कि कथा’ या सिनेमाच्या निर्मात्यांनी धर्मवादामुळे ‘सत्यप्रेम कि कथा ‘ असं सिनेमाचं बदललं गेलेलं सिनेमाचं नाव आणि आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अजून एक सिनेमा म्हणजे येत्या ५ ऑगस्टला प्रदर्शित होणारा ‘मासूम सवाल’ हा सिनेमा.

मासूम सवाल हा महिलांच्या मासिक पाळीबद्दल भाष्य करणार एक सिनेमा आहे. मासिक पाळीसारखा संवेदनशील विषय या सिनेमाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. तसेच या सिनेमातून मासिक पाळीबाबत असण्याऱ्या अंधश्रद्धा किंवा जे पूर्वग्रह आहेत त्यांनाही एका वेगळ्या पद्धतीने या सिनेमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पण, श्रीकृष्णाचा फोटो पॅडवर दाखवण्यात आलेले पोस्टर जेव्हापासून सोशियल मीडियावर पोस्ट केलं गेलं आहे, तेव्हापासून या पोस्टरवरून एक वाद निर्माण झाला आहे.सिनेमाचे दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी यावर स्पष्टीकरण देत सांगितलं की कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता.

सिनेमात एकावली खन्ना हिच्याशिवाय नितांशी गोयल, शिशिर शर्मा, मधु सचदेव, रोहित तिवारी, वृंदा त्रिवेदी, रामजी बाली, शशी वर्मा हे कलाकार आहेत. तर या सिनेमात वकिलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री एकावली खन्ना या स्पष्टरीकरण देताना म्हणते की ‘पहिली गोष्ट मला या वादाबद्दल माहिती नाही. परंतु जर असं काही झालं असेल तर मला एक गोष्ट सांगाविशी वाटते की निर्मात्यांचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नसणार. या सिनेमाचा हेतू केवळ मासिक पाळीबाबत समाजात जे चुकीचे विचार आहे ते दूर करण्याचा आहे. तसंच याबाबत जी अंधश्रद्धा आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’

Exit mobile version