spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेशला डेट करतेय तृप्ति डिमरी, फोटो शेअर करत दिली नात्याची कबुली?

याआधी तृप्ती 'बुलबुल' चित्रपटात दिसली होती, जो कर्णेशच्या कंपनीने बनवला होता. 'बुलबुल'च्या सेटवर दोघांची मैत्री झाली, तिचे रुपांतर प्रेमात झाले.

‘काला’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली तृप्ती डिमरी पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. वास्तविक तृप्तीने सोशल मीडियावर जाहीरपणे आपले प्रेम व्यक्त केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री आणि अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता तृप्तीने स्वतः कर्णेशसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करून तिचे नाते अधिकृत केले आहे.

तृप्ती डिमरीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपट दिग्दर्शक सौरभ मल्होत्राची स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये तुप्ती आणि कर्णेश रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. फोटोमध्ये दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून उभे आहेत, तर कर्णेश त्याच्या लेडी लव्हला गालावर किस करत आहे. तृप्तीचे नुकत्याच आलेल्या ‘काला’ या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयासाठी खूप कौतुक केले गेले आहे. या चित्रपटाची निर्मिती अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेशची निर्मिती संस्था क्लीन स्लेट फिल्म्सने केली आहे. याआधी तृप्ती ‘बुलबुल’ चित्रपटात दिसली होती, जो कर्णेशच्या कंपनीने बनवला होता. ‘बुलबुल’च्या सेटवर दोघांची मैत्री झाली, तिचे रुपांतर प्रेमात झाले.

तृप्ती डिमरीने २०१७ मध्ये पोस्टर बॉईजमधून आपला चित्रपट प्रवास सुरू केला होता. ‘लैला मजनू’ या चित्रपटाने तिला बॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली असली तरी. यानंतर ‘बुलबुल’ चित्रपटादरम्यान कर्णेशने तृप्तीच्या आयुष्यात प्रवेश केला. त्यानंतर ‘काला’ चित्रपटाने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. ‘काला’ने तृप्तीला चाहत्यांची पसंती तर दिलीच पण दिग्दर्शकांच्या नजरेतही तिला बसवले. तृप्तीने या चित्रपटातून बरीच प्रशंसा मिळवली आहे.

हे ही वाचा:

शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन मुलीने उर्फ सना सईदने प्रियकराशी केला साखरपुडा, पहा प्रियकराने कसं केलं अभिनेत्रीला प्रपोज

Makarand Anaspure यांचे मालिकाविश्वात पुनरागमन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss