spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळेचं डंपरच्या धडकेत निधन

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचे निधन झालं आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने निधन झालं आहे. कल्याणी जाधवने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक लोकप्रिय मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. काही दिवसांपूर्वीच कल्याणीनें ‘प्रेमाची भाकरी’ नावाने कोल्हापुरात हॉटेल सुरू केले होते. शनिवारी रात्री हॉटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने तिचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

कल्याणी जाधव हि मूळच्या कोल्हापूरची असून सध्या महावीर कॉलेज परिसरात वास्तव्यास होती. कोल्हापूर सांगली महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे काही दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनेकडून या मार्गावर आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर डंपरच्या धडकेमुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याने महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे.

कल्याणी कुरळे हिने आठवडाभरापूर्वीच तिचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानिमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला… मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली…मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या.., असे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते.

हे ही वाचा :

आपण लवकरच सुषमा अंधारे यांची पोलखोल करुन पर्दाफाश करणार; ॲड. वाघमारे यांचा इशारा

PAK VS ENG T20 WC FINAL : पाकिस्ताने इंग्लंड समोर ठेवले १३८ धावांचे आव्हान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss