spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दोन दिग्गज अभिनेते Amitabh Bachchan आणि Rajinikanth झळकणार एकाच चित्रपटात

मनोरंजन सृष्टीमधील दोन दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रजनीकांत (Rajinikanth) या दोघांनी बॉलीवूडला आणि साऊथ चित्रपटांना एका पेक्षा एक चित्रपट दिले आहेत.

मनोरंजन सृष्टीमधील दोन दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रजनीकांत (Rajinikanth) या दोघांनी बॉलीवूडला आणि साऊथ चित्रपटांना एका पेक्षा एक चित्रपट दिले आहेत. दोघांचेही चाहते त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. आता ३२ वर्षांनी बिग बी अन् थलायवा एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी ‘हम’, ‘अंधा कानून’ आणि ‘गिरफ्तार’सारख्या चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे. त्यामुळे आता या दोघांचे चाहते या दोघांना सोबत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हे दोघे दिग्गज अभिनेते ३२ वर्षांनी स्क्रीन शेयर करताना दिसणार आहेत.

‘जेलर’ आणि ‘लाल सलाम’ या सिनेमाच्या शूटिंगनंतर रजनीकांत टीजे ग्रानवेल दिग्दर्शित ‘जय भीम’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहेत. ‘थलाइवर १७०’ हा रजनीकांतचा १७० वा चित्रपट असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे नाव ‘थलाइवर १७०’ ठेवण्यात आले आहे. ‘थलाइवर १७०’ या चित्रपटामध्ये बॉलीवूड मधील महानायक अभिनेता अमिताभ बच्चन हे महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत.

 

अमिताभ बच्चन आधी ‘पोन्नियिन सेल्वन’ या सिनेमातील चियान विक्रम यांना या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण आता या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि रजनीकांत दिसणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. ‘थलाइवर १७०’ या चित्रपटाच्या शूटिंग ला लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटामध्ये टॉलिवूड अभिनेता सूर्याचीदेखील झलक दिसणार आहे. वरिष्ठ अभिनेता रजनीकांत या चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी भवनमध्ये साजरा, जयंत पाटील म्हणाले…

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्य परेशान हो सकता है लेकीन…

सु्प्रिया ताईंना अजितदादांची मदत मिळणार नाही? Will Ajit pawar support Supriya Sule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss