spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Uorfi Javed ला आली जीवे मारण्याची धमकी

Uorfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed ) फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. उर्फी जावेद कधी कोणती फॅशन करेल हे कोणालाच ठाऊक नसते. तसेच ती वेगवेगळया प्रकारच्या कपड्यांवर प्रयोग करत असते. आणि त्या कपड्यांमुळे सतत ट्रोल होताना दिसत असते. तर आता अभिनेत्री उर्फी जावेदला (Uorfi Javed) जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली आहे.

व्हॉट्सअँप (WhatsApp ) कॉलवरुन अश्लील भाषेत शिवीगाळ करून उर्फी जावेदला बलात्काराची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच ती तिच्या फॅशन स्टाईल बद्दल या कॉलमध्ये बोलण्यात आले आहे. उर्फी जावेदने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये (Goregaon Police Station )तक्रार केली आहे. उर्फीने नविन गिरी नावाच्या व्यक्ती विरोधात गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये (Goregaon Police Station) गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणासंबंधित चौकशी करत आहे. या प्रकरणात पोलिसांनी कोणालाही अद्याप अटक केल्याचे वृत्त समोर आले नाही.

 

उर्फी जावेद ही तिच्या विचित्र फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. तसेच उर्फी सोशल मिडीयावर सतत वेगवेगळया प्रकारचे आऊटफिट करून फोटो शेअर करत असते. ती acting, modeling, advertainment मध्ये काम करताना दिसली आहे. उर्फीने दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, ये रिश्ता क्या कहलाता है अश्या अनेक मालिकेमध्ये कामगिरी दाखवली आहे. उर्फीच्या पोस्टवर सतत कमेंटचा वर्षाव होतो. बिग बॉस ओटीटीमुळे (Bigg Boss OTT) तिला खूप प्रसिद्धी मिळाली. उर्फीच्या इंस्टाग्राम अकाउंटला ३.९M इतके तिचे फॉलोअर्स आहेत.

तसेच काही दिवसापूर्वी उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्या व्हिडिओ मध्ये ती सायकल चालवताना दिसत आहे, सायकल चालवताना तिच्या सायकलची चेन तुटते आणि सायकल चालवताना ती अशी कल्पना करत असते की, सायकलच्या चेन पासून देखील ड्रेस बनवता येऊ शकतो. उर्फीने बऱ्याच वेळा धागे आणि अनेक गोष्टी पासून ड्रेस (dress) बनवला आहे. पण तिने यावेळी सायकलच्या साखळीपासून ड्रेस (dress) बनवून लोकांना घायाळ करून ठेवले आहे.

हेही वाचा : Avatar 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गाजवले अधिराज्य

‘मुलगी झाली हो’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Latest Posts

Don't Miss