spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Urfi Javed उर्फी जावेद साखळीच्या ड्रेस मुळे पुन्हा एकदा झाली ट्रोल

Urfi Javed : बिग बॉस ओटीटीमधून (Bigg Boss OTT) प्रसिद्ध झालेली अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फी जावेदने पुन्हा एकदा असा ड्रेस बनवला आहे की लोक तो ड्रेस पाहून अचंबित झाले. उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्या व्हिडिओ मध्ये ती सायकल चालवताना दिसत आहे, सायकल चालवताना तिच्या सायकलची चेन तुटते आणि सायकल चालवताना ती अशी कल्पना करत असते की, सायकलच्या चेन पासून देखील ड्रेस बनवता येऊ शकतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

 

अभिनेत्री उर्फी जावेद प्रत्येक वेळी वेगवेगळया प्रकारे आऊटफिट करून फोटोशूट करत असते. तसेच ती तिच्या फॅशन सेन्सने (fashion sense) लोकांचे लक्ष वेधून टाकते. उर्फी जावेद कुठेही गेली की तिच्याकडे सर्वांच्या नजरा असतात. उर्फी प्रत्येक वेळी वेगवेगळे कारनामे करत असते आणि लोकांचे लक्ष वेधू टाकते. सध्या अभिनेत्री उर्फी जावेदचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड धुमाकूळ घालताना दिसत आहे.

 

उर्फीच्या या व्हिडिओवर चाहते सतत कमेंट करतांना दिसत आहे. एका काळी असे होते की लोकांना उर्फी जावेदचे कपडे आवडत नसायचे पण आता तीच लोक तिच्या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव आणि तिचे प्रचंड कौतुक करत आहे. उर्फीच्या व्हिडिओवर कमेंट करतांना लोक अशी कमेंट करतांना लिहित आहेत की तिला खरोखर डोक आहे, नाहीतर सायकलच्या साखळीपासून कोणाला ड्रेस बनवता येईल.

 

अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) काही दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर (Instagram) एक फोटो (photo) शेअर करून तिने माहिती दिली होती की तिने ज्या प्रकारचा ड्रेस बनवला आहे, त्या ड्रेस मुळे तिला प्रचंड जखमा झाल्या आहेत. पण ते काही लोकांना समजले नाही. उर्फीने बऱ्याच वेळा धागे आणि अनेक गोष्टी पासून ड्रेस (dress) बनवला आहे. पण तिने यावेळी सायकलच्या साखळीपासून ड्रेस (dress) बनवून लोकांना घायाळ करून ठेवले आहे.

हेही वाचा : 

Gujarat भूपेंद्र पटेल यांनी दुसऱ्यांदा घेतली गुजरात मुख्यमंत्री पदाची शपथ

प्रेमात लागलेल्या अनेक ‘बांबूं’ची गोष्ट…’ ‘बांबू’ चित्रपटाचा टीझर सर्वत्र प्रदर्शित

 

Latest Posts

Don't Miss