Urfi Javed चे चित्रा वाघ यांना आव्हान, मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे फक्त…

आपल्या ड्रेससिंगमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत असते. तसेच ती घालत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे कपडे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात.

Urfi Javed चे चित्रा वाघ यांना आव्हान, मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे फक्त…

आपल्या ड्रेससिंगमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच चर्चेत असते. तसेच ती घालत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे कपडे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. उर्फि जावेद ही ती घालत असलेल्या कपड्यांमुळे या पूर्वी अनेकदा नेटकऱ्यांकडून ट्रोल देखील झाली आहे. आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फी जावेदवर (Urfi Javed) जोरदार निशाणा साधला होता. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यात ट्विटर युद्धच सुरु आहे. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होत आहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतीये.’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी शेअर केलं होतं. उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ‘उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करा’ अशी मागणी चित्रा वाघ यांनी पोलिसांकडे केली. आता उर्फीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चित्रा वाघ यांनी केलेल्या या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फी जावेदनं शेअर केलं ट्वीट :

उर्फीनं ट्विटरवर शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘माझ्या नवीन वर्षाची सुरुवात एका राजकीय नेत्याच्या पोलीस तक्रारीने झाली! राजकारण्यांकडे काही काम नाहीत का? मला तुरुंगात पाठवता येईल, असे राज्यघटनेत एकही कलम नाही. अश्लीलता, नग्नतेची व्याख्या व्यक्तीनुसार बदलते. माझे स्तन आणि योनी हा भाग झाकलेला असतो, त्यामुळे तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही. हे लोक केवळ मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी हे करत आहेत. चित्रा वाघ, मला तुम्हाला काही कामं सांगायची आहेत, मुंबईमध्ये मानव तस्करी मोठ्या प्रमाणात आहे, त्यासाठी काय करता येईल? याचा विचार करा. ते बेकायदेशीर डान्सबार बंद कसे करायचे? (जे अजूनही बरेच आहेत) याचा देखील विचार करा. मुंबईतील बेकायदेशीर वेश्याव्यवसायाच्या विरोधात काय करता येईल? हे देखील बघा.’

‘मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे फक्त तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संपत्तीबाबत उघडपणे सांगा. राजकारणी कुठून आणि कसे पैसे कमावतो? ते जगाला सांगा. तुमच्या पक्षात अनेक पुरुष आहेत. छळवणूक वगैरे प्रकार अनेकदा समोर येतात. त्यासाठी चित्रा वाघ तुम्ही काय करता?’ असंही उर्फीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं. उर्फीनं तिच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘चित्रा वाघ यांना सोडून, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा’

 चित्रा वाघ यांनी दिलेल्या पत्रात नेमकं काय? :

“उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार, स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही.

मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा. पोलीस आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली, असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये मुंबई पोलिस आणि भाजप या दोन्हीला टॅगही केले आहे.

चित्रा वाघ यांनी काय म्हटलं आहे ट्विटरवर? :

शी..SS अरे हे काय चाललं आहे मुंबईत. रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणे नंगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला मुंबई पोलिसांकडे IPC/CRPC आहेत की नाही? तात्काळ बेड्या ठोका हिला. एकीकडे निष्पाप महिला/ मुली विकृतांच्या शिकार होत आहेत आणि ही बया अजून विकृती पसरवते आहे. असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद यांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिने उत्तान कपडे घातले आहेत. मात्र या ट्विटला उर्फी जावेदने रोखठोक उत्तर दिलं आहे.

काय म्हटलं आहे उर्फी जावेदने? :

तुमच्यासारख्या राजकारण्यांना पाहून फारच वाईट वाटतं. लोकांच्या नजरेत येण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करत आहात. बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोष देणं फार सोयीचं आहे. बेरोजगारी, लाखो बलात्कार झाल्याची प्रलंबित प्रकरणं, खुनांची अनेक प्रकरणं आणि अनेक समस्या आहेत त्यांचं काय? तुमच्यासारखे राजकारणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला ठेवतात. ज्या महिलांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात काहीच का करत नाही? महिलांचं शिक्षण, त्यांचा विकास याकडे तुम्ही लक्ष का देत नाही? अशा प्रश्नांची मालिकाच उपस्थित करत उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा:

कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, तर उपमुख्यमंत्री गैरहजर राहण्याची शक्यता

नवे वर्ष,नवे नियम ! जाणून घ्या काय आहेत बदल आणि त्याने तुमच्या बजेटवर कसा होणार परिणाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version