जया बच्चनचा ‘तो’ व्हिडीओ पाहून उर्फी जावेदचा पारा चढला

अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी नुकत्याच मुंबईमध्ये पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती.

जया बच्चनचा ‘तो’ व्हिडीओ पाहून उर्फी जावेदचा पारा चढला

अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी नुकत्याच मुंबईमध्ये पार पडलेल्या एका फॅशन शोमध्ये हजेरी लावली होती. या फॅशन शोमधील जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन या काही फोटोग्राफर्सवर भडकलेल्या दिसत आहेत. आता जया बच्चन (Urfi Javed) यांचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्री उर्फी जावेदनं जया यांच्यावर टीका केली आहे.

जया बच्चनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओवर आता उर्फी जावेदने देखील प्रतिक्रिया दिली असून तिने जया बच्चन यांना चांगलेच सुनावले देखील आहे. उर्फी जावेदने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर जया बच्चनचा तो व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, तुम्ही कधीच जया बच्चन बनू नका. उर्फी म्हणाली, ‘मी आशा करते की, तुम्ही दोन वेळा पुन्हा पडा, असं त्या म्हणाल्या? प्लिज यांच्यासारखं अजिबात होऊ नका. सगळ्यांची प्रगती व्हावी, असा विचार करावा. जे कॅमेऱ्याच्या मागे लोक आहेत आणि जे पुढे आहेत त्या सर्वांची प्रगती व्हावी. तुम्ही वयानं मोठे आणि सामर्थ्यवान आहात, म्हणून लोक तुमचा आदर करत नाहीत. तर जेव्हा तुम्ही लोकांसोबत आदराने वागता तेव्हाच लोक तुमचा आदर करतील’

याशिवाय उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आणखी एक नोट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे की, ‘मला माझे विचार मांडायला आवडत नाही. पण कधीकधी मी स्वतःवर संयम ठेवू शकत नाही. अर्थात मला माहीत आहे की मी जे करतेय त्याने मला कामाच्या संधीही गमवाव्या लागतील. पण गप्प राहणं आता शक्य नाही. मला वाटतं जे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे नसतात त्यावर बोलणं आपण टाळतो. यावरून तुम्ही कसे आहात हे समजतं.’ या स्टोरी मधून उर्फीने जया बच्चन यांच्या वर्तनावर चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

Uunchai : मैत्रीवर भाष्य करणाऱ्या ‘ऊंचाई’चा ट्रेलर रिलीज

आलिया भट ‘या’ हॉस्पिटलमध्ये देणार तिच्या बाळाला जन्म, जाणूनघ्या पूर्ण माहिती

T20 World Cup : आज टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध सामना सांगणार, संघातील उणीवा दूर करण्याची शेवटची संधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version