spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Urmila Matondkar : उर्मिला मातोंडकरचं ओटीटी विश्वात पदार्पण

मनोरंजनसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) आहे. बालकलाकार ते सुपरस्टार असा उर्मिलाचा प्रवास आहे.

मनोरंजनसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) आहे. बालकलाकार ते सुपरस्टार असा उर्मिलाचा प्रवास आहे. या प्रवासात तिने अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. आता उर्मिला ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. लवकरच तिची ‘तिवारी’ (Tiwari) ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

 ‘तिवारी’ या वेबसीरिजमध्ये उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत आहे. आई-मुलीच्या गोड नात्यावर भाष्य करणारी ही वेबसीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये उर्मिला दमदार भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अँक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी उर्मिला गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेत आहे. ‘तिवारी’ या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना अँक्शनचा तडका, नाट्य आणि मजेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. ‘तिवारी’ वेबसीरिज संदर्भात उर्मिला म्हणाली,”तिवारी’ या वेबसीरिजच्या माध्यमातून मला एक सशक्त, जिद्दी भूमिका करायला मिळत आहे. या वेबसीरिजमुळे मला अनेक गोष्टी शिकता आल्या. या वेबसीरिजचं कथानक माझ्या पसंतीस उतरल्याने मी ही वेबसीरिज करण्याचा निर्णय घेतला”. ‘तिवारी’ या वेबसीरिजच्या माध्यमातून उर्मिला ओटीटी विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. कमान सौरभ वर्माने या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘सत्या’, ‘एक हसीना थी’, ‘भूत’, ‘रंगीला’ ‘कौन’, ‘पिंजर’ अशा अनेक सिनेमांत उर्मिलाने काम केलं आहे.

हे ही वाचा:

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

Gautam adani : गौतम अदानी यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रात आणखी तीन कंपन्या जोडल्या, आता शेअर्सला गती मिळाली

IND vs SA : केएल राहुल, विराटला अंतिम सामन्यासाठी दिली विश्रांती, तर आजच्या सामन्यात शाहबाजचे पदार्पण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss