मुंबई :- (Urvashi Rautela and Rishabh Pant) क्रिकेट वर्तुळातीळ उगवता तारा असलेला ऋषभ पंत आणि बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला या दोघांमध्ये आता पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या अफेअरच्या चर्चानी वातावरण गरम असताना उर्वशीने दिलेल्या एका मुलाखतीमुळे त्यांच्यात आता शाब्दिक वॉर रंगला आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, बॉलीवूड अभिनेत्रीने ‘मिस्टर आरपी’ बद्दल एक किस्सा सांगितला, ज्यानंतर ऋषभ पंतची इंस्टाग्राम स्टोरी सांगून एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये ”मेरा पीछा छोड़ दो बहन, झूठ की भी हद होती है।’ असे होते. आता या वादाला पुढे नेत उर्वशी रौतेलाने ट्विट करून उत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये उर्वशीने ऋषभ पंतला “छोटू भैया” असे संबोधले असून ऋषभ पंतला क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला आहे. उर्वशीने तिच्या ताज्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘छोटू भैय्याने फक्त बॅट-बॉल खेळावे. मी काही मुन्नी नाही जी बदनाम होईल, ती सुद्धा तुझ्यासाठी किडू प्रिय आहे. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. आरपी छोटू भैया. शांत मुलीचा गैरफायदा घेऊ नका’. एवढेच नाही तर उर्वशीने स्वतःला ‘कूगर हंटर’ असेही संबोधले आहे.
Chotu bhaiyaa should play bat ball 🏏. Main koyi munni nahi hoon badnam hone with young kiddo darling tere liyee
#Rakshabandhan Mubarak ho #RPChotuBhaiyya #Cougarhunter #donttakeadvantageofasilentgirl #love #UrvashiRautela #UR1 pic.twitter.com/AA3APRFViY— URVASHI RAUTELA🇮🇳 (@UrvashiRautela) August 11, 2022
उर्वशी रौतेलाने नुकतीच एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने मिस्टर आरपीबद्दल एक किस्सा सांगितला आणि म्हणाली, ‘मी वाराणसीमध्ये शूटिंग करून दिल्लीला आले होते जिथे माझा शो होणार होता. मी दिवसभर शूटिंग केले. मिस्टर आरपी मला भेटायला आले होते आणि ते लॉबीमध्ये माझी वाट पाहत होते. १० तासांच्या शूटिंगनंतर मी परत आले तेव्हा मी ठाकली होती तर झोपी गेली. मला कितीतरी वेळा फोन आला, पण मला कळले नाही. मला जाग आली तेव्हा मला १६ – १७ मिस्ड कॉल्स दिसले. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मग मी त्याला म्हणाले की तू मुंबईला आल्यावर भेटू आणि मुंबईमध्ये भेटलो.
हे ही वाचा :-
खाते वाटप लवकरच होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस