spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाण्यात ‘वाळवी’च्या टीमने दिले रोड सेफ्टीचे धडे

सध्या महाराष्ट्रभर ‘वाळवी’ लागली असून प्रेक्षकांकडूनही या ‘वाळवी’ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला समीक्षकांनीही पसंती दर्शवली आहे.

सध्या महाराष्ट्रभर ‘वाळवी’ लागली असून प्रेक्षकांकडूनही या ‘वाळवी’ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला समीक्षकांनीही पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या ‘वाळवी’चाच बोलबाला आहे. नुकतीच ‘वाळवी’च्या टीमने ठाण्यात आयोजित झालेल्या ३३ व्या रोड सेफ्टी वीकमध्ये हजेरी लावली. या वेळी स्पप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे यांनी बाईक रॅलीचे उद्घाटन केलं. या चित्रपटाची भुरळ सिनेसष्टीलाही पडली आहे. अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. ‘वाळवी’ची खासियतही काही कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. एकंदरच लाकूड पोखरणारी ही ‘वाळवी’ सगळ्यांची मनं जिंकत आहे.

‘वाळवी’ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी केली आहे. या चित्रपटात सर्वांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री अनिता दाते हे दोघे आपल्याला दिसून येणार आहेत. तर हे दोघे नवरा बायकोच्या नात्यात आपल्याला दिसून येणार असून ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहेत. मात्र हा स्वप्नीलने आखलेला डाव असून यात त्याला शिवानी मदत करत असल्याचे दिसतेय. हे सगळं होत असतानाच सुबोध त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि गूढ असणाऱ्या ‘वाळवी’त स्वप्नील आणि शिवानीचा मनसुबा पूर्ण होणार की, आखलेला डाव फिरणार ? सुबोधकडे असे नक्की काय गुपित आहे? वाळवीचा या सगळ्याशी काय संबंध ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा चित्रपट बघितल्यावरच समजणार आहे. हा चित्र १३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. नुकताच ‘वाळवी’ हा रहास्यपट सर्वत्र प्रदर्शित झाला असून झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित या चित्रपटात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे, नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी लिखित ‘वाळवी’ हा मराठीतील पहिली थ्रिलकॅाम चित्रपट आहे.

‘वाळवी’ हा चित्रपट एक वेगळा विषय आहे. शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. यापूर्वी झी स्टुडिओज आणि परेश मोकाशी यांनी मराठी सिनेसृष्टीला एलिझाबेथ एकादशी, हरीशचंद्राची फॅक्टरी आणि चि. व चि. सौ. का. असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

 

हे ही वाचा:

Ved Marathi Movie, तिसऱ्या आठवड्यात देखील ‘वेड’चीच हवा, परंतु लोकांनी रितेशकडे केली एक अनोखी तक्रार

सर्वात मोठी बातमी, सत्यजीत तांबेंचही होणार निलंबन? हायकमांडची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिफारस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss