spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नाना पाटेकर यांची नाना रुपं; ‘ओले आले’ मध्ये रंगून गेले नाना

'वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,' हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर या कलंदर व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे.

‘वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,’ हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर या कलंदर व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. पण.. एखादे नाठाळ… खोडसाळ… प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. ‘ओले आले’ या चित्रपटातून नानांचे आणखी काही कलारंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘ओले आले’ हा चित्रपट नाना पाटेकरांच्या फॅन्ससाठी एक सरप्राईज पॅकेज असणार आहे हे नक्की.

मुलाच्या मागे-मागे फिरणारे.. खोड्या काढणारे.. जीवापाड प्रेम करणारे.. आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारे नाना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. शिस्तप्रिय बाबांच्या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट अशी ही नानांची भूमिका आपल्याला पोट धरून हसायला लावतेय. आजवर नानांच्या विविध भूमिका आपण पाहिल्या आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काही तरी देऊनच जाते. अशीच ‘ओले आले’ चित्रपटातली नानांची भूमिका ”जगणं समृद्ध करायला शिकवणारी आहे” असं ते सांगतात. चला जगूया, हसूया, फिरूया म्हणणारे नाना पाटेकर कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ओले आले’ या चित्रपटाद्वारे येत्या ५ जानेवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला भेटणार आहेत. या चित्रपटात नाना पाटेकरांसोबतच मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव यांच्या ही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.

तसेच ‘ओले आले’ चित्रपटात ‘व्यस्त रहा.. पण मस्त रहा..’ असं म्हणणारे नाना सिद्धार्थला जगण्याचे सूत्र सांगताना दिसताहेत. खरं तर हा मूलमंत्र ते स्वतःच्या दैनंदिन व्यवहारातून, कधी प्रेमाने तर कधी हट्टाने मुलाला शिकवू पाहताहेत. बाबा आणि मुलाच्या या मजेशीर जुगलबंदीमध्ये मकरंद अनासपुरे देखील सामील झालेले दिसणार आहेत. आपलं आयुष्य आनंदी, समाधानी असावं असं म्हणणारे मकरंद अनासपुरे या कुटुंबाचा महत्त्वाचा घटक झालेले आहेत.

हे ही वाचा:

‘Vd 18’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान वरुण धवणच्या पायाला दुखापत

अ‍ॅनिमलच्या यशानंतर तृपी डिमरी करणार कार्तीक आर्यनसोबत स्क्रीन शेअर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss