वरूण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट या दिवशी प्रेक्षकांच्या भेटलीस येणार, पोस्टर आले समोर

वरूण धवनचा ‘भेडिया’ चित्रपट या दिवशी प्रेक्षकांच्या भेटलीस येणार, पोस्टर आले समोर

प्रत्येकजण बॉलीवूड सुपरस्टार वरुण धवनचा पुढचा चित्रपट Bhedia ची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, वरुणच्या या चित्रपटाबाबत मोठे अपडेट्स समोर येत आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी गुरुवारी ‘भेडिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. यासोबतच या चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याचीही माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत अभिनेत्री क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा : 

CM एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याच्या पोस्टरनंतर, टीझरची झलक आली समोर

‘भेडिया’ हा चित्रपट

बॉलिवूड चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर वरुण धवनच्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाविषयी मोठी माहिती दिली आहे. तरणने आपल्या पोस्टमध्ये लांडग्याचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरसोबत तरण आदर्शने लिहिले आहे की – वरुण धवन आणि क्रिती सेनन स्टारर फिल्म भेडिया २५ नोव्हेंबर २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यासोबतच शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी भेडियाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याची घोषणाही होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कोणत्या दिवशी प्रदर्शित होणार याची माहिती टीम भेडिया सादर करणार आहे. बातम्यांनुसार, दिवाळीच्या मुहूर्तावर भेडियाचा ट्रेलर रिलीज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘एकनाथ शिंदेंच्या सभा या बाळासाहेबांच्या आहेत की काय, असा भास होतो’ उदय सामंतांचे व्यक्तव्य

चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन आहेत. अमर आणि दिनेश या जोडीने यापूर्वी स्त्री आणि बाला असे दोन सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अशा परिस्थितीत भेडियासुद्धा प्रेक्षकांची अजिबात निराशा करणार नाही, अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच चाहत्यांची उत्कंठा अधिकच वाढली आहे. वरुण धवनचा हा चित्रपट एक हॉरर ड्रामा स्टोरी असू शकतो असे सांगितले जात आहे.

एकता कपूरच्या अडचणीत वाढ XXX मालिकेनंतर होतेय पद्मश्री परत घेण्याची मागणी

Exit mobile version