Bhedia Box Office Collection : वरूणच्या चित्रपटाने सलग दुस-या दिवशी पकडला वेग, इतक्या कोटींची कमाई

Bhedia Box Office Collection : वरूणच्या चित्रपटाने सलग दुस-या दिवशी पकडला वेग, इतक्या कोटींची कमाई

वरूण धवन (Varun Dhawan) आणि क्रिती सॅनॉन (Kriti Sanon) यांचा क्रिएचर कॉमेडी चित्रपट भेडिया आजकाल थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपटात वरुणला वेअरवॉल्फमध्ये रूपांतरित होताना पाहण्याची प्रेक्षकांची आवड वाढत आहे, म्हणूनच भेडियाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ (Drishyam 2) चित्रपटाला टक्कर दिली असून, दुसऱ्या दिवशी जगभरात १४.६० कोटींची कमाई केली आहे

भेडियाने (Bhedia) पहिल्या दिवशी जगभरात १२.०६ कोटी कमावले, तर दुसऱ्या दिवशी जगभरात १४.६० कोटींची कमाई करत चित्रपटाने २६.६६ कोटींची कमाई केली आहे. रविवारी यासाठी कमाई करणे खूप महत्वाचे आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल, अशी अपेक्षा होती. भेडिया, हळुहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

हेही वाचा : 

जी२० परिषदेमध्ये नरेंद्र मोदींनी युवकांना सहभागी होण्याचं केलं आव्हान

वरुण धवन आणि क्रिती सेननसोबत अभिषेक बॅनर्जी, सौरभ शुक्ला आणि दीपक डोबरियाल यांनी भेडियामध्ये काम केले आहे. हॉरर कॉमेडी फ्रँचायझीमधला हा तिसरा चित्रपट आहे ज्याची सुरुवात स्त्रीने केली आहे. स्त्रीचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनीही भेडियाचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय स्त्री चित्रपटातील कलाकारांनी यात कॅमिओ केला आहे. भेडिया हा हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलगू भाषांमध्येही प्रदर्शित झाला आहे.

कॉमेडी चित्रपट भेडियाने बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या दृष्यम २ चित्रपटाशी स्पर्धा केली, ज्याने दोन आठवड्यांत जगभरात १५० कोटींहून अधिक कमाई केली आहे आणि तरीही लोकांमध्ये चित्रपटाची क्रेझ कायम आहे. ज्याप्रकारे गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जात आहेत. त्या तुलनेत भेडिया हा चित्रपट चांगली कमाई करतोय. कतरिना कैफचा फोन भूत (Phone Bhoot) हा चित्रपट तर बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेला. आता वरुण धवनचा चित्रपट ‘दृश्यम २’ समोर टिकून राहतो की काही दिवसांनंतर गळफास लावतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्या आठवणीतले विक्रम गोखलेंची, ‘ते आमच्या आयुष्यात आले, त्यांची भूमिका बजावली आणि निघून गेले’

Exit mobile version