Ved Marathi Movie, तिसऱ्या आठवड्यात देखील ‘वेड’चीच हवा, परंतु लोकांनी रितेशकडे केली एक अनोखी तक्रार

अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुखच्या (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Ved Marathi Movie, तिसऱ्या आठवड्यात देखील ‘वेड’चीच हवा, परंतु लोकांनी रितेशकडे केली एक अनोखी तक्रार

Ved Marathi Movie : अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुखच्या (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामार्फत रितेशने दिगदर्शनामध्ये पाऊल टाकले आहे तर जिनिलियाने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. या सेलिब्रिटी कपलने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा आता तिसरा आठवडा सुरु आहे तरी देखील प्रेक्षकांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणत मिळत आहे. ‘वेड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आणि आता तिसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. परंतु वेड संदर्भात प्रेक्षकांनी एक अनोखी तक्रार केली आहे.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत नागराज मंजुळेंचा ‘सैराट’ हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर होता. या सिनेमाने १२. १० कोटींची कमाई केली होती. आता ‘वेड’ या सिनेमाने हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. परवा शनिवारपर्यंत ‘वेड’ या चित्रपटाने एकूण ४४.९२ कोटींचा गल्ला जमवला होता. काल रविवारी ‘वेड’ने मोठी झेप घेतली. दिवसेंदिवस या सिनेमाच्या कमाईचा आलेख हा वाढत चालला आहे. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातही या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे.

रितेश देशमुखने वेड या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. या चित्रपटातून जेनेलिया देशमुख मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. तसेच बऱ्याच वर्षानंतर ती रितेशसोबत रुपेरी पडद्यावर काम करताना दिसली आहे. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत लाभले आहे. गाणी अजय-अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. या चित्रपटात अशोक सराफ रितेशने साकारलेल्या पात्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. रितेश-जेनेलियासोबत विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, जिया शंकर हे कलाकार चित्रपटात दिसले आहेत.

हे ही वाचा : 

Ved चित्रपटाचे यश पाहून चाहत्यांनी दिला रितेश देशमुखला ‘हा’ सल्ला

Ved Movie Trailer Out बहुप्रतीक्षित ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चाहत्यांची सिमेना पाहण्याची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version