ज्येष्ठ अभिनेत्री Suhasini Deshpande काळाच्या पडद्याआड, कलाविश्वात पसरली शोककळा…

सुहासिनी यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर कलाविश्वात शोककळा पसरली आहे. सुहासिनी देशपांडे यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारत चाहत्यांचे मनोरंजन केलं.

ज्येष्ठ अभिनेत्री Suhasini Deshpande काळाच्या पडद्याआड, कलाविश्वात पसरली शोककळा…

मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री सुहासिनी देशपांडे (Suhasini Deshpande) यांचं काल (दि. २७ ऑगस्ट २०२४) रोजी निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी सुहासिनी देशपांडे यांनी अखेरचं श्वास घेतला. झगमगत्या विश्वातून सुहासिनी देशपांडे यांच्या निधनामुळे सिनेविश्वात आणि चाहत्यांच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सुहासिनी यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर कलाविश्वात शोककळा पसरली आहे. सुहासिनी देशपांडे यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारत चाहत्यांचे मनोरंजन केलं.

सुहासिनी देशपांडे यांनी मराठीबरोबरच हिंदीतील अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनेक सिनेमांमधून सुहासिनी यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनी रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ या सिनेमातही अभिनय केला होता. आता त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. सुहासिनी देशपांडे यांचे मनोरंजन विश्वातील योगदानाबद्दल सांगायचं झालं तर, सुहासिनी देशपांडे यांनी वयाच्या १२ व्या वर्षांपासून कलाविश्वात अभिनयाला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीचे मोठं नुकसान झाले आहे.

सुहासिनी देशपांडे यांनी एकंदरीत ७० वर्षापेक्षा अधिक काळ कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. सुहासिनी देशपांडे यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रात मानाचं कुंकू (१९८१), कथा (१९८३), आज झाले मुक्त मी (१९८६), आई शपथ … (२००६) चिरंजीव (२०१६), धोंडी (२०१७) आणि २०१९ मधील बाकाल या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’ आणि ‘सासूबाईंचं असंच असतं’ या नाटकांमधूनही त्या रंगभूमीवर दिसल्या होत्या. त्यांच्या रंगभूमीवरील योगदानासाठी आणि कार्याबद्दल सुहासिनी देशपांडे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेतर्फे ‘जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव’ पुरस्काराने २०१५ साली सन्मानित करण्यात आलं.

सुहासिनी देशपांडे यांच्या निधनानंतर अनेक चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. तर सुहासिनी देशपांडे यांच्यावर पुण्यामध्ये अंत्यसंस्कार होणार आहे. आज (दि. २८ ऑगस्ट २०२४) रोजी सुहासिनी देशपांडे यांच्यावर वैंकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

हे ही वाचा:

Jay Shah ICC: जय शाह यांची अध्यक्षपदी निवड, क्रिकेट विश्वात शुभेच्छांचा वर्षाव, भाई मला माहीत आहे की…काय म्हणाला Gautam Gambhir?

Mahyuti चे राजकीय गणित बदलणार?; Fadnavis यांचे Shivaji Patil यांच्या नावाचे अप्रत्यक्ष संकेत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version