spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Actress Jamuna Passes Away, ज्येष्ठ तेलुगू अभिनेत्री जमुना यांचं ८६ व्या वर्षी निधन

ज्येष्ठ तेलुगू अभिनेत्री जमुना यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबाद येथील राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला .

ज्येष्ठ तेलुगू अभिनेत्री जमुना यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबाद येथील राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला . जमुना यांच्या निधनानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जमुना यांनी तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.

 जमुना यांनी १९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या गरिकापती राजाराव यांच्या पुट्टील्लू चित्रपटामधून पदार्पण केले होते. तेव्हा त्या फक्त १५-१६ वर्षांच्या होत्या. १९५५ मध्ये एलव्ही प्रसाद यांच्या मिसम्मा चित्रपटात काम केल्यानंतर त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. तसेच श्रीकृष्ण थुलाभारममधील सत्यभामाच्या भूमिकेसाठी ज्येष्ठ दिग्गज ती तेलगू प्रेक्षकांमध्ये सत्यभामा म्हणून प्रसिद्ध आणि प्रेमळपणे ओळखली जाते. दोरिकिते डोंगलू, श्रीमंथुडू ‘अप्पू चेसी पप्पू कूडू’, ‘भाग्यरेखा’, ‘डोंगा रामुडू’, ‘पूजा फलम’, ‘गुंडम्मा कथा’, ‘मूगा मनसुलु’ आणि ‘लेथा मनसुलु’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे. १९६५ मध्ये जमुना यांचं लग्न जुलुरी रमणा राव यांच्याशी झाले होते आणि त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा वामसी जुलुरी आणि मुलगी स्रावंती जुलुरी आहेत, जी एक कलाकार आहे.

जमुना यांनी अभिनय कारकिर्दीत, जमुनाने तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदीमधील १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एनटी रामाराव, अक्किनेनी नागेश्वरा राव, कृष्णा घट्टामनेनी, शोभन बाबू, कृष्णम राजू यासारख्या सिनेमाच्या दिग्गजांच्या सोबत महिला मुख्य भूमिकेत काम केले. जमुना यांच्या निधनानं साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्युनियर एनटीआर (Jr NTR), महेश बाबू (Mahesh Babu), चिरंजीवी (Chiranjeevi) या अभिनेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन जमुना यांना श्रद्धांजली वाहिली आहे

हे ही वाचा:

आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी ? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

दादरची आग तर विझली परंतु राजकारण तापलं, कालिदास कोळंबकर म्हणाले…

Pathaan Housefull, शाहरुख खानचा पठाण काश्मिरमध्ये करतोय जादू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss