मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) आगामी बहुचर्चित चित्रपट ‘व्हिक्टोरिया’ (Victoria ) हा आज सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण सोनाली कुलकर्णीचे चाहते तिच्या हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. तितक्यात सोनाली कुलकर्णीच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून चाहत्यांना माहिती देण्यात आली की ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाचे प्रदर्शन एक महिना पुढे ढकलण्यात आले आहे. तर हा सिनेमा १३ जानेवारी २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशी माहिती सोशल मिडीया इंस्टाग्राम पोस्ट मधून चित्रपटाच्या निर्मात्यांतर्फे अधिकृतरीत्या देण्यात येत आहे. पण याच मूळ कारण हे हॉलिवूड चित्रपट अवतार (Avatar) असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) ‘व्हिक्टोरिया’ (Victoria) हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच बरोबर अलीकडेच ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला होता आणि प्रेक्षकांचाही या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. पण आतापर्यंत आपण हे पाहतच आलो आहे की बिग बजेट चित्रपटांमुळे छोट्या चित्रपटांची गळचेपी आणि नुकसान होत आलं आहे. सोनाली कुलकर्णीच्या ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाबरोबरही असाच प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावरआणि इंस्टाग्राम पोस्ट मध्ये असे सांगण्यात येत आहे की “बॉक्स ऑफिसवर जास्तीत जास्त शोज सह आणि इतर कोणत्याही संघर्षां शिवाय प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे निर्मात्यांचे ध्येय आहे आणि याच दृष्टिकोनातून निर्माते ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलत आहोत.” असे व्हायरल झालेल्या इंस्टाग्राम पोस्ट्स मध्ये सांगण्यात येत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार हॉलिवूड बिग बजेट चित्रपट अवतार (Avatar) हा चित्रपटाच सुद्धा आजच भारतात प्रदर्शित झाला आहे. आणि त्यामुळे राज्यातील सर्वच मुख्य सिनेमागृह आणि स्क्रीन हे या बिग बजेट चित्रपताकडून बुक करण्यात आले आहेत. त्यामुळे व्हिक्टोरिया’ (Victoria) चित्रपटाला स्क्रीन साठी खूप संघर्ष करावा लागतो आहे. म्हणूनच या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
View this post on Instagram
‘व्हिक्टोरिया’ (Victoria) चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही मुख्य भूमिकेत असणार आहे आणि तिच्या बरोबरच पुष्कर जोग (Pushkar Jog), अक्षय कुलकर्णी (Aashay Kulkarni) देखील या चित्रपटात दिसणार आहेत. ‘व्हिक्टोरिया’ चित्रपट १३ जानेवारी २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हे ही वाचा :
मविआच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुंबईत भाजपचं ‘माफी मांगो’ आंदोलन
Gautami Patil गौतमी पाटीलच्या चालू कार्यक्रमात दगडफेक, चाहते चढले स्टेजवर
Gautami Patil गौतमी पाटीलच्या चालू कार्यक्रमात दगडफेक, चाहते चढले स्टेजवर