spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘भूल भूलैया ३’ मध्ये मंजुलिका येणार परत,विद्या बालनची चित्रपटात एन्ट्री

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालन यांचा 'भूल भुलैया' हा चित्रपट २००७ मध्ये सुपरहिट झाला.

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री विद्या बालन यांचा ‘भूल भुलैया’ हा चित्रपट २००७ मध्ये सुपरहिट झाला.या चित्रपटातील मंजुलिका हे पात्र साकारणारी विद्या बालन हिने केलेला अभिनय म्हणजे अंगावर शहारे आणण्यासारखा होता.तिने केलेल्या “आमी जे तोमार” या गाण्यावर केलेला डान्स अन् तिचं भयानक रुप ‘मंजुलिका’चं नाव घेतलं की डोळ्यसमोर येतं.त्या चित्रपटातील चित्तथरारक दृश्य आजहा अंगावर काटे उमटवतात.या चित्रपटात विद्या बालनसह अक्षय कुमारनेही महत्तवाची भूमिका साकारली आहे.

दरम्यान या चित्रपटाचा दुसरा भाग ‘भूल भुलैया २’ २०२२ मध्ये आला होता, पण या सिनेमात अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसला. हा सिनेमासुद्धा लोकांना चित्रपट खूप आवडला. कार्तिक आर्यनच्या कामाचे कौतुक झाले.या चित्रपटात कार्तिक सोबत कियारा अडवाणी आणि तब्बू सुद्धा दिसून आले.तर आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तर या भागची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उस्तुकत्ता निर्माण झाली आहे.तिसऱ्या भागाची खूप चर्चादेखील झाली. आता कार्तिक आर्यनने आपल्या आगामी चित्रपटाबाबत काही महत्वाच्या अपडेट्स शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटात ‘मंजुलिका’ची भूमिका कोण साकारणार याबद्दल माहिती दिली. त्याचा हा चित्रपट कधी रिलीज होणार हेही त्याने सांगितले आहे.

कार्तिकने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हडिओ ‘भूल भुलैया’ ची व्हिडिओ क्लिप आहे, ज्यामध्ये मंजुलिकाच्या भूमिकेत विद्या बालन ‘मेरे ढोलना’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यनही दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कार्तिकने लिहिले आहे की, ‘मंजुलिका भूल भुलैयाच्या दुनियेत परतत आहे, विद्या बालनचे स्वागत करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’यासोबतच त्याने असेही लिहिले आहे की, ‘भूल भुलैया ३’ या दिवाळीत रिलीज होणार आहे. आता प्रेक्षक या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. भूल भुलैया-3 या चित्रपटात आणखी कोणते कलाकार काम करणार? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

हे ही वाचा: 

प्राजक्ता माळी झळकणार ‘भिशी मित्र मंडळ’ या आगामी चित्रपटात

Devendra Fadnavis यांच्या उपस्थितीत Ashok Chavan यांचा भाजपमध्ये प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss