लिगर मध्ये ‘विजय देवरकोंडा’ चमकला पण, पुरी जगन्नाध चित्रपट चाहत्यांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला

लिगर मध्ये ‘विजय देवरकोंडा’ चमकला पण, पुरी जगन्नाध चित्रपट चाहत्यांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा ‘लिगर’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. पुरी जगन्नाध यांनी चित्रपटांचे दिग्दर्शित केलं आहे. लिगर हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होत आहे. लिगरच्या प्रोमोज आणि गाण्यांनी चित्रपटाची कथा उघड केलेली नाही. धर्मा प्रॉडक्शन-पुरी कनेक्ट्स हे या चित्रपटसाठी तीन वर्षांपासून मेहनत करत होते. या चित्रपटाला महामारीमुळे विलंबांचा सामना करावा लागला आहे. यात माइक टायसन आणि रम्या कृष्णन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

महाराष्ट्र पुन्हा अलर्टवर! मुंबई – पुण्यात घातपाताची शक्यता

चित्रपट व्यापार विश्लेषक गिरीश जोहर म्हणाले की, प्रेक्षक लिगरची वाट पाहत आहेत . “धर्मा प्रॉडक्शन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. देशातील सर्व कानाकोपऱ्यांमध्ये आणि शहरांमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यात ते कमी पडले नाहीत. प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे, जे प्रमोशनल इव्हेंट्समध्ये अनन्या आणि विजयची एक झलक पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीवरून दिसून येते”, असे त्यांनी आपले मत मांडले आहे.

हा चित्रपट आज म्हणजेच २५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. चित्रपटात बॉक्सर माइक टायसन देखील गेस्ट अपिरियन्समध्ये दिसणार असून त्याची झलक चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. त्यामुळे तर चाहते चित्रपट पाहण्यासाठी जास्तच उत्सुक आहेत. विजय देवराकोंडाची फॅन फॉलोईंग जबरदस्त असल्यामुळे, चाहत्यांना त्याचा अधिकाधिक स्क्रीन स्पेस बघायला आवडेल. लीगरच्या ट्रेलरवर येणाऱ्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरून हे कळते कि, चाहते फक्त विजयला पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाणार आहेत.

हेही वाचा : 

गरोदरपणात महिलांनी या ९ घटकांकडे कधीही दुर्लक्ष करू नये

Exit mobile version