‘कुशी’ चित्रपटासाठी विजय देवरकोंडा याने घेतली तब्बल इतके कोटी …

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) यांचा नुकताच कुशी (Kushi) हा चित्रपट रिलीज झालाय.

‘कुशी’ चित्रपटासाठी विजय देवरकोंडा याने घेतली तब्बल इतके कोटी …

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि सामंथा रुथ प्रभु (Samantha Ruth Prabhu) यांचा नुकताच कुशी (Kushi) हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभु हे दिसले. विशेष म्हणजे विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभु यांचा ‘कुशी’ हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. ‘कुशी’ हा चित्रपट ०१ सप्टेंबरला रिलीज झालाय. या चित्रपटाने तूफान अशी कमाई करण्यासही सुरूवात केलीये. विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभु यांची जोडी चाहत्यांना मोठ्या प्रमाणात आवडल्याचे दिसत आहे. चित्रपटाने धमाका करण्यास सुरूवात केलेली आहे.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) यांचा काही दिवसांपूर्वीच ‘लाईगर’ (Liger) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचेही जोरदार प्रमोशन करताना विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे हे दिसले. अनन्या पांडे हिने ‘लाईगर’ चित्रपटाच्या माध्यमातून साऊथमध्ये डेब्यू केला. लाईगर चित्रपटाला साऊथमध्ये मोठे प्रेम मिळताना देखील दिसले. लाईगर चित्रपटासाठी विजय देवरकोंडा याच्या अभिनयाचे काैतुक केले गेले. विजय देवरकोंडा याचा ‘कुशी’ हा चित्रपट देखील मोठी धमाल करतोय. विशेष म्हणजे ‘कुशी’ चित्रपटासाठी विजय देवरकोंडा याने तब्बल २३ कोटी रुपये रूपये फिस घेतल्याचे सांगितले जात आहे. विजय देवरकोंडा हा साऊथचा तगडी फिस घेणारा अभिनेता आहे. विजय देवरकोंडा याचे चित्रपट नेहमीच धमाका करताना बाॅक्स आॅफिसवर दिसतात.

सामंथा रुथ प्रभु हिने देखील कुशी चित्रपटाची मोठी फिस घेतलीये. करण जोहर (Karan Johar) याच्या शोमध्ये याबद्दल काही दिवसांपूर्वीच खुलासा करताना सामंथा रुथ प्रभु ही दिसली होती. असे सांगितले जाते की, सामंथा रुथ प्रभु हिने कुशी चित्रपटासाठी ४.५ कोटी रूपये फिस घेतली आहे. चाहत्यांना विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभु यांची जोडी आवडली आहे. सामंथा रुथ प्रभु आणि विजय देवरकोंडा यांच्या फिसमधील फरकामुळे ‘कुशी’ चित्रपट चर्चेत होता. आता चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चित्रपट बाॅक्स आॅफिसवर अनेक रेकाॅर्ड हा नक्कीच तोडू शकतो. निर्मात्यांना देखील या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. पुढील काही दिवस बाॅक्स आॅफिसवर ‘कुशी’ चित्रपटाची हवा बघायला मिळेल.

हे ही वाचा: 

रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिला सल्ला

Asia Cup 2023, भारत आणि नेपाळ यांचा सामनाही पावसामुळे रद्द झाला तर….

 Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version