spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विकास पाटील दिसणार नव्या भूमिकेत

विकास पाटील नवीन भूमिकेत दिसून येणार आहे.विकासने त्याच्या नविन भूमिकेबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

मराठी सृष्टितील अभिनेता विकास पाटील ह्याने त्याच्या अभिनयाने आता पर्यंत अनेक मालिकेत,नाटकात, चित्रपटात प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहेत.बिग बॉस सीझन 3 मध्ये त्याच्या उत्तम खेळामुळे तो नेहमीच चर्चेत असायचा विशाल निकम आणि विकास पाटील या दोघांच्या मैत्रीची चर्चा अख्या महाराष्ट्रात झाली होती.विकास सोशल मीडियावर बराच ऍक्टिव्ह राहत असून तो त्याच्या नविन प्रोजेक्ट बद्दल चाहत्यांसोबत शेअर करत असतो.तर आता विकास पाटील नवीन भूमिकेत दिसून येणार आहे.विकासने त्याच्या नविन भूमिकेबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

तो आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.गंधार प्रोडक्शन निर्मित ‘विश्वनायक’ या हिंदी महानाट्यातून विकास आपल्या भेटीस येणार आहे. या नाटकात तो विश्वनायक स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारताना दिसेल. या हिंदी महानाटकाचं दिग्दर्शन मंदार टिल्लू यांनी केलं आहे आणि लेखन शिरीष लाटकर यांनी केलं आहे. तसंच श्रद्धा मोरे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे.विकास पाटील यांनी मुलाखातीत सांगितले की,स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारण्याची संधी मला लाभली हे माझं मोठं भाग्य आहे. ही भूमिका साकारतानाचा अनुभव माझ्यासाठी खास होता.

आजवर अनेक भूमिका केल्या; पण हिंदी रंगमंचावर इतक्या मोठ्या महामानवची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर सादर करणं ही अभिमानाची गोष्ट आहे’, असं विकासनं सांगितलं. या हिंदी नाटकात त्याच्याबरोबर ठाण्याचे आमदार संजय केळकर रामकृष्ण परमहंस यांच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. तसंच सतीश आगाशे, नीलपरी खानवलकर, राजू आठवले, सुकन्या काळण, मकरंद पाध्ये या कलाकारांचादेखील या नाटकात सहभाग आहे.

Latest Posts

Don't Miss