Vikram Vedha: सैफ अली खानने आर माधवनसोबत होणाऱ्या तुलनांवर दिली प्रतिक्रिया म्हणाला…

विक्रम वेधा हा २०१७मध्ये याच नावाने प्रदर्शित झालेल्या तमिळ हिटचा अधिकृत रिमेक आहे.

Vikram Vedha: सैफ अली खानने आर माधवनसोबत होणाऱ्या तुलनांवर दिली प्रतिक्रिया म्हणाला…

सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांची प्रमुख भूमिका असलेला विक्रम वेधा हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटाचे प्रोमोशन देखील मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अलीकडेच, सैफने हृतिकसोबत दोन दशकांनंतर पुन्हा एकत्र येण्याबद्दल खुलासा केला आणि त्याने शक्य तितक्या आनंददायक पद्धतीने त्याचा अनुभव शेअर केला.

विक्रम वेधा हा २०१७मध्ये याच नावाने प्रदर्शित झालेल्या तमिळ हिटचा अधिकृत रिमेक आहे. हृतिक आणि सैफ अनुक्रमे विजय सेतुपती आणि आर माधवन यांनी साकारलेल्या पात्रांची पुनरावृत्ती करत आहेत. विक्रम वेधासाठी एकत्र काम कण्यापूर्वी, हृतिक आणि सैफ यांनी ना तुम जानो ना हम मध्ये एकत्र काम केले होते, जो २००२मध्ये रिलीज झाला होता. त्यामुळे दोन दशकांनंतर, दोन अष्टपैलू कलाकार एकमेकांसमोर येणार आहेत.

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सैफ अली खानने २० वर्षांनंतर हृतिक रोशनसोबत विक्रम वेधा चित्रपटात एकत्र काम करण्याबाबत खुलासा केला. सैफ म्हणाला, “मी हृतिकसोबत काम करण्यासाठी उत्सुक आणि नर्वस दोन्हीही होतो. मी त्याचे चित्रपट पाहिले आहेत आणि कधीकधी त्याच्याकडे पाहताना इतर काहीही पाहणे खूप कठीण होऊन जाते. त्याच्या आजूबाजूला सुंदर मुली असू देत किंवा पडद्यावर शांत सूर्यास्त असू दे परंतु आपण या माणसाकडे पाहणे थांबवू शकत नाही.”

पुढे सैफ अली खानने आर माधवनने तमिळ विक्रम वेधामध्ये साकारलेल्या पत्राशी होत असलेल्या तुलनेबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. सैफ अली खान म्हणाला, “मी खरंतर तुलनांचे स्वागत करतो. मी माधवनचा खूप आदर करतो. मला माहित आहे की त्याने चांगले काम केले आणि त्याची तुलना होणे हे साहजिक आहे. एकदा मला कोणीतरी काहीतरी सांगितले. आपल्याला स्टार्स म्हणतात आणि त्यांची एक संपूर्ण आकाशगंगा आहे. आणि बरेच तारे या आकाशगंगेत आहेत आणि प्रत्येकजण भिन्न आहे.

हे ही वाचा:

“कुठलेही फोटो…” भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्यानंतर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत, जाणून घ्या मौनी रॉयची कहाणी 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version