विक्रांत रोना तमिळ ओटीटी रिलीज: तारीख, वेळ, कुठे आणि केव्हा पहावे?

विक्रांत रोना २ सप्टेंबर २०२२ रोजी फक्त कन्नड भाषेत ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. 

विक्रांत रोना तमिळ ओटीटी रिलीज: तारीख, वेळ, कुठे आणि केव्हा पहावे?

कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील व्हिज्युअल अॅक्शन अॅडव्हेंचर, विक्रांत रोना हा २०२२ मधील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. त्याच्या बॉक्स ऑफिस यशानंतर, OTT दर्शक या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

२८ जुलै २०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने २ सप्टेंबर रोजी OTT पदार्पण केले परंतु तो फक्त मूळ कन्नड भाषेत होता, किच्छा सुदीपच्या इतर चाहत्यांनी खूप दिवस वाट पाहिली आणि अजूनही तमिळ आणि मल्याळम प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रु. ९५ कोटी बजेट, मिश्र प्रतिक्रियांसह हा महाग अॅक्शन चित्रपट प्रदर्शित झाला, समीक्षकांनी वारंवार कथानकावर प्रश्न उपस्थित केले, परंतु व्हीएफएक्स आणि अॅक्शन दिग्दर्शनाचे सर्वत्र कौतुक झाले. त्यामुळे दिग्दर्शक अनुप भंडारी यांच्यासाठी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

बहुप्रतीक्षित कन्नड भाषेतील अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर थ्रिलर विक्रांत रोना २८ जुलै २०२२ रोजी प्रदर्शित झाला, हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दीर्घकाळ चालण्याची अपेक्षा होती. मात्र चित्रपट गृहातून प्रेक्षकांचा निरोप घेत विक्रांत रोना २ सप्टेंबर २०२२ रोजी फक्त कन्नड भाषेत ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.

हिंदी, तेलुगु, तमिळ आणि मल्याळम भाषांचे डिजिटल अधिकार Disney+ Hotstar ने विकत घेतले आहेत, त्यामुळे या चित्रपटाच्या हिंदी आणि तेलुगू आवृत्त्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

तमिळ, मल्याळम, हिंदी आणि तेलुगूसह सर्व चार आवृत्त्या एकाच तारखेला रिलीज होण्याची अपेक्षा होती परंतु, डिस्ने+ हॉटस्टारने हिंदी आणि तेलुगु एकत्र रिलीज केले, त्यामुळे तमिळ आणि मल्याळम प्रेक्षकांनी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागली होती. पण, प्रेक्षकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

सुदीपा, निरुप भंडारी, जॅकलीन फर्नांडिस, नीथा अशोक अभिनीत या चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, या अॅक्शन थ्रिलरसाठी IMDb रेटिंग १० पैकी ७.७ आहे.

हे ही वाचा:

Bhagwan Vishwakarma Pooja : भगवान विश्वकर्मा कोण आहेत? जाणून घ्या त्यांचे पूजन का केलं जाते

जेफ बेझोसला मागे टाकत गौतम अदानी बनले जगातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version