संगीत क्षेत्रातून केजरीवालांना धक्का,’राज्यकारभारात धर्माला स्थान नसावं’- विशाल दादलानी यांची पोस्ट व्हायरल

संगीत क्षेत्रातून केजरीवालांना धक्का,’राज्यकारभारात धर्माला स्थान नसावं’- विशाल दादलानी यांची पोस्ट व्हायरल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लक्ष्मी आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचा फोटो चलनावर लावण्याची मागणी केली आहे. केंद्रशासित प्रदेश दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनंतर केंद्र सरकारकडे केलेल्या या मागणीवरून आता राजकारण तापले आहे. ही मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी २६ ऑक्टोबरला केली. भारतीय चलन रुपयावर माता लक्ष्मी आणि भगवान गणेशाचे चित्र लावण्याने भारताची अर्थव्यवस्था सुधारेल, असे ते म्हणाले. त्याचवेळी विशाल ददलानी यांनी कोणाचेही नाव न घेता अरविंद केजरीवाल यांच्या मागणीचा निषेध केला आहे.

हेही वाचा : 

Saptashrungi Mandir : आजपासून ते १३ नोव्हेंबरपर्यंत सप्तशृंगी देवीच्या मंदिराचे दार भाविकांसाठी २४ तास खुलं

संगीतकाराने सोशल मीडियावर लिहिले की, ‘भारताचे संविधान म्हणते की आपण धर्मनिरपेक्ष समाजवादी प्रजासत्ताक आहोत. त्यामुळे राज्यकारभारात धर्माला स्थान नसावे. मला हे स्पष्ट करायचे आहे की, जो धर्माचा कोणताही भाग सरकारच्या कोणत्याही बाबीमध्ये आणतो त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. जय हिंद.’ विशाल दादलानने आपल्या ट्विटमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र त्यांचे ट्विट वाचून युजर्सनी हे ट्विट अरविंद केजरीवाल यांच्यासाठी केले असल्याचा अंदाज लावला जात आहे. कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे वक्तव्य जारी केल्यानंतर काही तासांतच त्यांनी ही पोस्ट केली आहे.

Aditya Thackeray : शिंदे-फडणवीसांआधी ठाकरेंनी पुन्हा मारली बाजी, आदित्य ठाकरे आज पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार

Mumbai Local Train : लोकल सेवा खोळंबली, अंबरनाथ-बदलापूर दरम्यान तांत्रिक बिघाडमूळे प्रवाशांचे हाल

Exit mobile version