spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विवेक अग्निहोत्रीला दिल्ली हायकोर्टाची माफी मागावी लागली, जाणून घ्या कारण

भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) हिंसाचार प्रकरणात कार्यकर्ता गौतम नवलखा यांना दिलासा देण्यात न्यायाधीश पक्षपातीपणा करत असल्याच्या न्यायालयाच्या अवमान प्रकरणात चित्रपट निर्माते विवेक यांनी मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयासमोर बिनशर्त माफी मागितली. न्यायालयाने अग्निहोत्री आणि इतरांविरुद्ध एकतर्फी कारवाई करण्याचा निर्णय दिल्यानंतर अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी माफी मागितली आहे.

न्यायमूर्ती मुरलीधर यांनी १४ वर्ष दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले. नंतर त्यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात जानेवारी २०२१ पर्यंत काम केले. सध्या ते ओरिसा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. अलीकडेच ‘न्यायमूर्ती मुरलीधर यांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील कार्यकर्ता गौतम नवलखा याचा जामीन मंजूर करत पक्षपात केला असल्याचे’ ट्विट विवेक अग्नीहोत्री यांनी केले होते. तर या प्रकरणी विवेक अग्निहोत्री यांनी वकिलामार्फत न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केलं होते. त्या प्रतिज्ञापत्रात अग्निहोत्री यांनी कोर्टाला सांगितलं होत की त्यांनी केलेलं ट्विट हटवले होते, दरम्यान, न्यायालयाने त्यांना प्रत्यक्ष भेटून माफी मागण्यास सांगितले आहे. “आम्ही अग्निहोत्रींना उपस्थित राहण्यास सांगत आहोत कारण त्यांचे ट्विट निंदा करणारे आहेत. त्यांना वैयक्तिकरित्या पश्चात्ताप व्यक्त करावा लागल्यास त्यांना काही अडचण आहे का? प्रतिज्ञापत्राद्वारे पश्चात्ताप नेहमीच व्यक्त केला जाऊ शकत नाही,” अशी टिपणी खंडपीठाने केली आहे.

तर विवेक अग्निहोत्रीं यांच्या प्रतिज्ञा पत्रात लिहिलेल्या वक्तव्यावर अग्निहोत्रींच्या विरोधात युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी टिपण्णी केले आहे की अग्निहोत्रीचे ट्विट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने हटवले होते, नवलखा, यांना नंतर २०२० मध्ये अटक करण्यात आली होती आणि डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या ‘एल्गार परिषद’ कॉन्क्लेव्हमध्ये केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांशी संबंधित असलेल्या या प्रकरणात सध्या नजरकैदेत आहे,भीमा कोरेगाव हिंसाचारात कथित भूमिकेसाठी गौतम नवलखा हा बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत आरोपी आहे.

हे ही वाचा : 

‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने दाखवावी, अजित पवार

Vedant Marathe Veer Daudale Saat मराठी चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला फर्स्ट लुक अक्षय कुमारनं केला शेअर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss