दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर शाहरुख आणि सलमानवर साधला निशाणा

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री चे ट्विट चर्चेत

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर शाहरुख आणि सलमानवर साधला निशाणा

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ट्विट

मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अनेकदा आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांचा द काश्मीर फाइल्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाशी संबंधित अनेक वाद रंगले. आता विवेक त्यांच्या एका ट्विटर पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी आपल्या ट्विटर पोस्ट मधून सलमान खान आणि शाहरुख खानवर निशाणा साधला आहे.

विवेक अग्निहोत्री यांच्या चित्रपटाचे सर्वांनी कौतुक केले. परंतू तरी या चित्रपटाला बॉलिवूड सेलिब्रिटींकडून कोणत्याही प्रकारची दाद मिळाली नाही असेच म्हणावे लागेल. विवेक अग्निहोत्री म्हणाले होते की काश्मीरमधील काश्मिरी पंडितांची खरी शोकांतिका दाखवण्याची हिंमत बॉलीवूडमधील बहुतेक लोकांमध्ये नाही, म्हणून जेव्हा त्यांच्या चित्रपटाचे कौतुक होत होते तेव्हा बॉलिवूड मधील कलाकार तेव्हा गप्प होते.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विट मध्ये लिहिले की, जोपर्यंत बॉलीवूडमध्ये किंग, बादशाह, सुलतान आहेत, तोपर्यंत ते बुडत राहणार आहे. लोकांच्या कथा ऐकून त्यावर एखादा चित्रपट बनवा, अशा चित्रपटांचे जागतिक स्तरावर कौतुक केले जाईल.

हेही वाचा

दे धक्का 2 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्विटमुळे याबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. एका ट्विटर युजरने विवेक अग्निहोत्रीच्या समर्थनार्थ लिहिले की, “एस आर के (SRK) आता बॉलीवूडचा बादशाह राहिलेला नाही”. आणखी एका युजरने लिहिले, “भारतीय सिनेमा समाजात लोकशाहीकरणाची गरज आहे”. त्याचवेळी एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘बादशाह, सुलतान, ही नावं चाहत्यांनी त्यांना दिली आहे, त्यांनी स्वतःहून ठेवलेली नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने बॉलीवुड मध्ये योगदान देत आहे. यात राग मानण्यासारखे काही नाही.”

Exit mobile version