spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विवेक ओबेरॉयने केला धक्कादायक खुलासा, म्हणाला ‘मी आत्महत्या करण्याचा विचार करत होतो…’

अभिनेता विवेक ओबेरॉयने (Vivek Oberoi) नेहमीच आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. पूर्ण प्रामाणिकपणे तो आपले काम करत असतो. अभिनेता म्हणून दूरचा विचार करणारा विवेक आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांवर वेगळाच प्रभाव टाकत असतो. मात्र तो बऱ्याच दिवसांपासून अभिनय जगतापासून गायब होता. पण त्याच्या उत्कृष्ट पात्रांची झलक अनेक शानदार चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. बॉलिवूड ते ओटीटी असा प्रवास करणाऱ्या विवेक ओबेरॉयने ((Vivek Oberoi) नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. विवेक ओबेरॉय त्याच्या काळात इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय अभिनेता होता. पण मुली त्याला वेड्यात काढायच्या. एक वेळ अशी आली की तो इंडस्ट्रीतून अचानक गायब झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विवेकने आपली व्यथा मांडली आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्र थंडीची लाट येण्याची शक्यता, पश्चिमी प्रक्षोभामुळे होणार राज्यातील तापमानात मोठी घट

या मुलाखतीत विवेक ओबेरॉयनं सांगितले, जवळपास दीड वर्ष माझ्याकडे कोणतेही काम नव्हते अशा दिवसांनाही मला सामोरे जावे लागले आहे. जेव्हा मी ऑडिशनसाठी जायचो तेव्हा मी बॉलीवूड अभिनेता सुरेश रॉयचा मुलगा असल्याचं सांगत नव्हतो. त्या काळात माझ्या मनात अनेक वाईट विचार आले होते. एकदा तर मी हे सगळं संपवण्याचा विचार केला होता. आसपासच्या नकारात्मक वातावरणामुळे मी त्रस्त होतो. कदाचित हाच अजेंडा असावा आणि असे अजेंडे कधी कधी आपल्याला आतून कोलमडून टाकतात. त्या काळात माझी पत्नी प्रियंका माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची होती आणि तिच्यामुळे मी स्वत:ला ओळखू शकलो. सर्व काही संपवण्याचा अर्थ खूप खोल आहे आणि म्हणूनच सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) किंवा इतर कलाकार ज्या वेदना सहन करत आहेत ते मला जाणवू शकते अशी व्यथा विवेकनं मांडली.

महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर प्रगतीची ‘काशी’ होईलमी, उदयनराजे भोसले

हे दुःख विसरून पुढे जाण्याची हिंमत त्याच्या आईकडून मिळाल्याचे विवेक ओबेरॉयने सांगितले. पुढे तो म्हणाला की, त्याच्या आईने त्याची ओळख काही कॅन्सरग्रस्त मुलांशी करून दिली. जी मुलं लहान वयात मोठी लढाई लढूनही हसताना दिसतात. यामुळे त्याला पुढे जाण्याची हिंमत मिळाली. यानंतर, चित्रपटांव्यतिरिक्त, विवेक ओबेरॉय ओटीटी मालिकांमध्ये देखील दिसू लागला. अलीकडेच तो सुनील शेट्टीच्या धारावी बँकेत दिसला होता, ज्यामध्ये त्याची भूमिका चांगलीच गाजली होती.

सीमावादावर गृहमंत्री अमित शाह काय करणार?

Latest Posts

Don't Miss