Waltair Veerayya Movie Review, चिरंजीवीच्या चाहत्यांसाठी खास माहिती

Waltair Veerayya Movie Review, चिरंजीवीच्या चाहत्यांसाठी खास माहिती

मेगास्टार चिरंजीवीचा (Chiranjeevi) नवा चित्रपट, वॉल्टेअर वीरय्या (Waltair Veerayya), ज्याने या त्याच्या या चित्रपटाच्या प्रचंड प्रमाणात केलेल्या प्रमोशनसह मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या होत्या. आज हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला आहे. आता आपण या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आहे हे बघणार आहोत. प्रेक्षकांच्या मते दक्षिण भारतीय चित्रपट रोमँटिक दृष्टीकोनातून अजिबात प्रगत नाही आहेत. त्याचप्रमाणे या वेळेसही तीच चुकी झाल्याचे आढळून आले आहे. ती समस्या म्हणजे या चित्रपटातील प्रमुख नायक हा अभिनेत्रींपेक्षा ३१ वर्षांनी मोठा आहे. चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, प्रमुख नायक हा अभिनेत्रीच्या प्रेमात पडतो आणि अभिनेत्रीला एकटक पाहत असतो आणि या सीनसाठी अभिनेत्रीच्या शरीरावर वरपासून खालपर्यंत कॅमेरा पॅन करण्यात आला आहे. याला प्रेक्षकांनी एक समस्या म्हणून अधोरेखित केले आहे.

अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) हा या चित्रपटात वॉल्टेअर वीरय्या (Waltair Veerayya) या पात्राची भूमिका साकारतो आहे. यामध्ये त्याने मच्छीमाराची भूमिका साकारली आहे. आणि अभिनेता बॉबी सिम्हा (Bobby Simha) या चित्रपटात सोलोमन सीझर नावाच्या पात्राची भूमिका साकारत आहे. तो चित्रपटातील एक कुख्यात ड्रग डीलरचे काम करतो आहे. अभिनेता राजेंद्र प्रसाद (Rajendra Prasad) आणि रवी तेजा (Ravi Teja) हे देखील चित्रपटात सीथापाथी आणि मायकेल सीझर या पर्वतांची भूमिका साकारत आहेत. चित्रपटातील कथेनुसार वॉल्टेअर वीरय्या हा वॉलटेरमधील मच्छीमार आहे. मलेशियामधून कुख्यात ड्रग डीलर सोलोमन सीझर याला परत आणण्यासाठी आणि त्याला मदत करण्यासाठी सीथापाथी हा पोलीस त्याच्याशी संपर्क साधतो. वीरय्या त्याच्या टीमसह सोलोमनचे अपहरण करण्यासाठी मलेशियाला जातो. वीरय्याला मलेशियाला गेल्यावर सोलोमनचा भाऊ मायकेल सीझरबद्दल माहिती मिळते. पण या पुढे काय झाले? वीरय्या आणि मायकेलचा काय संबंध? एसीपी विक्रम सागर यांचा वीरय्याशी कसा संबंध आहे?, हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

चित्रपटातील दिग्दर्शक बॉबी यांनी चित्रपताची पटकथा लिहिली असून चित्रपटविषयी सांगितले आहे की, ही कथा आपल्या प्रेक्षकांना थोडीशी ओळखीची आहे, आणि चित्रपटातील मुख्य कलाकार चिरंजीवीबद्दल बोलताना बॉबी यांनी सांगितलं की,”चिरंजीवीने ते सिद्ध केले आणि त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो त्याच्या उत्कृष्ट विनोदी बोलीने त्याच्या चाहत्यांना आणि इतरांना मंत्रमुग्ध करू शकतो. भावनिक दृश्यांकडे पाहत असताना चिरंजीवीचा अभिनय अव्वल दर्जाचा आहे”, असे दोग्दर्शक बॉबी यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

Makar Sankranti 2023 मकर संक्रांतीचे वैज्ञानिक महत्त्व तुम्हाला माहीत आहे का?

चहाची सवय काही केल्या सुटत नाही? तर अशी मोडा सवय

makarsankrant 2023 भोगीच महत्व काय? का जगभरात साजरी केली जाते भोगी? जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version