spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Watch Video नवीन वर्षाच्या सुरुवातीला निक जोनसने केला भन्नाट व्हिडीओ शेअर, बॅकग्राऊंडमधील हिंदी गाणं ऐकून चाहते झाले थक्क

हॉलिवूड स्टार आणि गायक निक जोनास सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती निक जोनसने २०२२ सालातील त्याच्या सर्व आठवणींना कव्हर करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे, परंतु व्हिडिओच्या पार्श्वसंगीताने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. निक जोनसने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर २०२२ सालातील त्याच्या सर्व सुंदर आठवणींशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. व्हिडिओ निक जोनसच्या कौटुंबिक फोटोंनी भरलेला आहे, ज्यामध्ये तो पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. होळी खेळण्यापासून ते समुद्रकिनाऱ्यावरील सुट्टीपर्यंत, निकने २०२२ मध्ये त्याच्या कुटुंबासोबतच्या सर्वात खास क्षणांची झलक ह्या व्हिडिओतून दाखवली आहे.

निक जोनासने २०२२ ला निरोप देताना या व्हिडिओमध्ये आणखी एक खास गोष्ट म्हणजे, निक मालती मेरीसोबत मस्ती करताना दिसत आहे. इतकेच नाही तर आणखी एका गोष्टीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे पार्श्वसंगीत.. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीत ‘राता लांबिया’ हे हिंदी गाणे वाजत आहे, जे ऐकून चाहतेही थक्क झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

 तसेच व्हिडिओमध्ये प्रियंका आणि निक यांनी लॉस एंजेलिस हवेलीमध्ये साजरी केलेली होळी, मेक्सिकोमध्ये प्रियांकाचा तिच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी समुद्रकिनारी केलेले नृत्य, मालतीसोबत खेळत असतानाचे निकचे न पाहिलेले फोटो आणि अशा बऱ्याच खास क्षणांचा समावेश आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते खूप खुश झाले आहेत.

गायक-अभिनेता निकने जोनास ब्रदर्सच्या संगीत कॉन्सर्टशी संबंधित काही फोटो देखील शेअर केले आहेत. व्हिडिओ शेअर करताना, निकने कॅप्शनमध्ये लिहिले, “काय वर्ष आहे! २०२३ काय घेऊन येत आहे हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही…. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा..”

हे ही वाचा:

पठाण चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू, परदेशातील सर्व चित्रपटगृहे हाऊसफुल्ल

तुनिशा शर्माच्या आरोपांवर शिझानच्या बहिणींचं प्रतिउत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss