Watch Video, विस्कटलेले केस, सुजलेले डोळे… उर्फीची ‘ही’ अवस्था पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण!

आपल्या ड्रेससिंगमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमीच चर्चेत असते. तसेच ती घालत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे कपडे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात.

Watch Video, विस्कटलेले केस, सुजलेले डोळे… उर्फीची ‘ही’ अवस्था पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण!

आपल्या ड्रेससिंगमुळे आणि बोल्ड अंदाजामुळे उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमीच चर्चेत असते. तसेच ती घालत असलेले वेगवेगळ्या प्रकारचे कपडे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. तसेच तिच्या कपड्यांमुळे या पूर्वी अनेकदा नेटकऱ्यांकडून देखील ट्रोल झाली आहे. तिच्या याच कपड्यांमुळे नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच उर्फी हि वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पण उर्फी देखील काही क्षणात बसलेली नाही ती प्रश्नाला प्रतिउत्तर हि नेहमी देतच असते. पण सध्या उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यात उर्फीचे विस्कटलेले केस, सुजलेले डोळे हे दिसून येत आहेत.

सोशल मीडियावर उर्फी जावेदच्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये उर्फीचे विखुरलेले केस, काळी वर्तुळे, डोळ्यांखालील खुणा, सुजलेले डोळे… दिसून येत आहे. उर्फीची ही अवस्था पाहून तिचे चाहते टेन्शनमध्ये आले आहेत. उर्फी नो मेकअप लूकमध्ये होती आणि पापाराझींना पाहून तिने अचानक चेहरा लपवायला सुरुवात केली. त्या व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे कि उर्फी हि रात्री उशिरा तिच्या एका मैत्रिणीसोबत जेवणासाठी पोहचते. त्याचवेळी सर्व पापाराझींनी तिला सर्व बाजूनी घेतले. त्यांना पाहुन उर्फी हि चेहरा लपवत होती. त्यावेळेस उर्फीने हिरव्या रंगाच्या मोठ्या आकाराच्या टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातला होता. त्यात तिचे सर्व केस हे विस्कटलेले होते. पापाराझी तिचे फोटो आणि व्हिडिओ क्लीक करण्यासाठी धडपड करत होते. त्यामुळे तिच्या विस्कटलेल्या केसांनी उर्फी ही तिचा चेहरा लपवत असल्याचेही त्या व्हिडिओ मध्ये दिसून आले आहे. तसेच ती हात चेहऱ्यावर घेऊन देखील चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होती. तसेच उर्फी हॉटेल मध्ये पोहचली तरी देखील पापाराझी तिचे फोटो काढण्यासाठी तिचा पाठलाग करत होते.

हे ही वाचा:

सर्व तयारी झाली आहे, केसरकरांनी लवकरच तुरुंगात जाण्याची करावी, संजय राऊतांच्या इशारा

कर्मचारी आणि जनता वाऱ्यावर, महाराष्ट्र खड्यात टाकण्याचं षडयंत्र!, केदार दिघेंचा हल्लबोल

चित्र वाघ यांच्या पोलीस तक्रारीनंतर उर्फीची पोस्ट व्हायरल, माझ्या मनात आत्महत्येचे विचार…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version