पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे, त्यांच्या…अमेय खोपकरांच्या ट्वीटने वेधले लक्ष

अमेय खोपकर हे एक राजकारणी व्यक्तिमत्व व चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी आतापर्यंत लय भारी,येरे येरे पैसे यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली.

पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे, त्यांच्या…अमेय खोपकरांच्या ट्वीटने वेधले लक्ष

अमेय खोपकर हे एक राजकारणी व्यक्तिमत्व व चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी आतापर्यंत लय भारी,येरे येरे पैसे यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली. नुकतेच अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावरील ट्विटर (twitter)या माध्यमावर एक नवीन ट्विट केलेले आहे. हे त्यांचे ट्विट (tweet)सध्या सोशल मीडियावर (social media)खूप चर्चेत आहे. हा ट्विट त्यांनी पाकिस्तानी कलाकारांसाठी केलेला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी हे ट्विट करत पाकिस्तानी कलाकारांवर (Artists)निशाणा साधला आहे. त्यांच्या या ट्विटची (tweet)सोशल मीडियावर(social media) फार चर्चा चालत आहे.या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले,भारतात अशांतता माजवण्यासाठी सतत कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानची नियत पाक नाही हे ढळढळीत सत्य आहे. पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध भारतीयांचे बळी गेले. काहीजण हे विसरले असले तरी आम्ही विसरुच शकत नाही. म्हणूनच फक्त खेळाडूच नाही तर पाकिस्तानी कलाकारांना आमचा विरोध कायम आहे याची आठवण करुन देतोय. पाकिस्तानी कलाकार भारतीय सिनेमांमध्ये किंवा सिरीजमध्ये काम करणार असतील तर त्यांच्या तंगड्या तोडून त्यांच्याच हातात देऊ. त्याची जबाबदारी संपूर्णपणे संबंधित निर्मात्यांची राहील.या ट्विटला (tweet)२,२१४ लोकांनी पाहिले असून ९९ जणांनी या ट्विटला (tweet)लाइक दिले आहेत.

अमेय खोपकर हे नेहमी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानी कलाकारांवर निशाणा साधत असतात. यावेळीही त्यांनी असेच काही केले आहे. ‘बॉलिवूडमधील (bollywood)काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.’ असे ट्वीट (tweet)अमेय खोपकर यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते.

सनम तेरी कसम (Sanam Teri Kasam),रईज(Raees) ,कपूर अँड सन्स (Kapoor and sons)अशा अनेक बॉलीवूड(bollywood) चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलाकारांनी आतापर्यंत काम केलेले आहे.त्यातच आता अमेय खोपकर यांनी केलेल्या या ट्विटचे लोकांवर किती परिणाम होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

हे ही वाचा:

आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर

Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक

अल-हकीम मशिदीला भेट देण्यापासून ते अल-सिसीला भेटण्यापर्यंत, जाणून घ्या पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version