spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Welcome 3 लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

वेलकमला मिळालेल्या भरपुर प्रतिसादानंतर नंतर २०१५ मध्ये याचा दुसरा भाग रिलीज झाला. यात अक्षयचा पत्ता कट झाला मात्र अनिल कपुर अन् नाना पाटेकर यांची जोडी कायम होती.

२००७ सालचा वेलकम (Welcome) हा चित्रपट धमाल हिट ठरला. या चित्रपटात अक्षय कुमार अन् कतरिना कैफची जोडी पाहायला मिळाली जी खूप सुपरहिट ठरली. आजही हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. या चित्रपटात अक्षय अन् कतरिनाच्या जोडीपेक्षा नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्या जोडीला प्रेक्षकांनी जास्त प्रेम दिले. हा एक विनोदी चित्रपट असून या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षांकानी भरभरून प्रेम दिले.

वेलकमला मिळालेल्या भरपुर प्रतिसादानंतर नंतर २०१५ मध्ये याचा दुसरा भाग रिलीज झाला. यात अक्षयचा पत्ता कट झाला मात्र अनिल कपुर अन् नाना पाटेकर यांची जोडी कायम होती. दरम्यान आता पुन्हा वेलकम प्रेक्षकांचे मनोरंजन करायला प्रेक्षनकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी वेलकम ३ची (Welcome 3 ) घोषणा केल्यानंतर चाहते या चित्रपटासाठी खुपच आतूर झाले आहेत. मात्र आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांना या चित्रपटातून काढण्यात आले आहे. या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये ही जोडी दिसून आली होती मात्र तिसऱ्या भागात ही जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार नाही. वेलकम ३ (Welcome 3) मध्ये अनिल कपूर आणि नाना पाटेकर दिसणार नसल्याचा दावा ‘पिंकविला’ने (pinkVilla) दिलेल्या वृत्तात केला आहे. आता अनिल कपुर आणि नाना पाटेकर यांच्या जागी संजय दत्त आणि अर्शद वारसी हे या चित्रपटात दिसून येणार आहेत. तर आनंदाची गोष्ट म्हणजे यात अक्षय कुमारची या चित्रपटात पुन्हा एंट्री होणार आहे. मजनू भाई आणि उदय शेट्टीच्या भूमिकेत संजय दत्त आणि अर्शद वारसी यांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

वेलकममध्ये अक्षय कुमार दिसला होता. त्याच्या जबरदस्त कॉमेडीने प्रेक्षकांचे खुप मनोरंजन केले होते. मात्र वेलकम बॅकमध्ये जॉन अब्राहम दिसला. आता पुन्हा अक्षय कुमार दिसल्याने चाहते खुश आहेत. वेलकम ३ चे दिग्दर्शन कोण करणार हे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. त्याचबरोबर सुनील शेट्टी देखील या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान अक्षय कुमारचा ओह माय गॉड २ (Oh my god 2) हा चित्रपट ११ ऑगस्टला थेएटर्समध्ये रिलीज होणार आहे.

Latest Posts

Don't Miss