spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Welcome Baby Girl ! म्हणत दीपिका-रणवीरची सोशल मीडियावर पहिली पोस्ट…

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण (Superstar actress Deepika Padukone) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते.

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण (Superstar actress Deepika Padukone) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. परंतु सध्या ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे चांगलीच चर्चेत होती . अश्यातच दीपिका -रणवीरने एक आनंदाची बातमी सर्वाना दिली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपिका-रणवीर आई-बाबा झाले आहेत. बॉलीवूड इंडस्ट्रीबाबत बातम्या देणाऱ्या विरल भयानी याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर ही बातमी दिली आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (८ सप्टेंबर) दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे.

लग्नाच्या सहा वर्षांनंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी पहिल्या बाळाच्या जन्माची गोड बातमी दिली आहे. दीप-वीरच्या गूड न्यूजवर चाहत्यांचा वर्षाव पाहायला मिळत आहे, त्यासोबत बॉलिवूड सेलिब्रिटीही शुभेच्छा देताना दिसत आहे. दीपिका पादुकोणने 8 सप्टेंबर, 2024 रोजी, रविवारी मुंबईतील रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. दीपिका-रणवीर यांनी आई-बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दीप-वीरने सोशल मीडियावर पोस्ट करत ही गूड न्यूज दिली आहे. दीप-वीरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये “वेलकम बेबी गर्ल, 8.9.2024, दीपिका-रणवीर” असं लिहिलं आहे.

डिलिव्हरीच्या दोन दिवस आधी दीपिका आणि रणवीर हे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. या जोडप्याने कुटुंबासह बाप्पाचे आशीर्वाद घेतले होते. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यावेळी दीपिका हिरव्या रंगाच्या बनारसी साडीत तर रणवीर सिंग बेज कुर्ता पायजमामध्ये दिसला. गणरायाचा आशीर्वाद घेतल्यानंतर शनिवारी दीपिकाला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज रविवारी दीपिकाने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर पोस्ट करताच या दोघांवर मात्र चांगलाच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दीप-वीरच्या या “वेलकम बेबी गर्ल” पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दीपिका आणि रणवीरला सोशल मीडियावर शुभेच्छा मिळताना दिसत आहेत. दीपिका-रणवीरच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटींनीही कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूर, प्रियंका चोप्रा, सोनाक्षी सिन्हा या तिघींही ‘अभिनंदन’ लिहत ‘रेड हॉर्ट’ इमोजी कमेंट केल्याचं दिसत आहे. आलिया भट्टने भी हार्ट इमोजी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. हिमेश रेशमियाने शुभेच्छा देत लिहिलंय, ‘जय माता दी, लैट्स रॉक.’ अभिनेता अर्जुन कपूरने लिहिलंय, ‘लक्ष्मी आई है. द क्वीन इज हेयर.’ याच्यासोबत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. तर अभिनेत्री अनन्या पाडेंने लिहिलंय, ‘बेबी गर्ल… अभिनंदन’ आणि पुढे इविल आय इमोजी पोस्ट केलाय. तर रुबिना दिलैकने हॉर्ट इमोजसोबत ‘आशीर्वाद आणि प्रेम’ असं लिहिलंय.

हे ही वाचा:

Pune Monsoon Updates: दुर्घटना टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, Ajit Pawar यांचे नागरिकांना आवाहन

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss