भाऊच्या धक्क्यावर आज काय घडणार? अरबाज होणार कॅप्टन का नॉमिनेट?

झालेल्या दुखापतीमुळे संग्राम चौगुलेला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. या आठवड्यात संग्राम जरी घराबाहेर पडला असला तरी आणखी एक सदस्य घराबाहेर जाणार आहे.

भाऊच्या धक्क्यावर आज काय घडणार? अरबाज होणार कॅप्टन का नॉमिनेट?

बिग बॉस मराठी (Big Boss Marathi)च्या घरात शनिवारच्या भागात पहिला वाईल्ड कार्ड सदस्य बॉडीबिल्डर संग्राम चौगुले घराबाहेर गेला. संग्रामला कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलीच दुखापत झाली होती. त्याला इतकी दुखापत झाली होती की, त्याला बिग बॉसच्या घरात राहणं आणि पुढील टास्क खेळणं शक्य झालं नसत. झालेल्या दुखापतीमुळे संग्राम चौगुलेला बिग बॉसच्या घराबाहेर पडावं लागलं. या आठवड्यात संग्राम जरी घराबाहेर पडला असला तरी आणखी एक सदस्य घराबाहेर जाणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात पाच सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या नॉमिनेशन टास्कमध्ये अरबाज पटेल, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, सुरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात नेमका कोणता सदस्य घराबाहेर पडणार याकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अरबाज पटेल घराबाहेर पडण्याची सर्व नेटकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. वैभव चव्हाण घराबाहेर गेल्यानंतर आता अरबाज पटेलचा नंबर लागणार असल्याचे नेटकरी म्हणत आहेत. सोशल मीडियावर अरबाज पटेलबद्दल नाराजी असल्याचे दिसत आहे. टीम ए मधील निक्की आणि अरबाजच गेममध्ये राहिले असल्याने या दोघांपैकी एकाला घराबाहेर काढण्याची मागणी नेटकरी करत आहेत.

सोशल मीडियावर एका नेटकाऱ्याने तर अशी कमेंट केली आहे की, “अरबाज आणि निक्कीला सोडून वोटिंग करा”. तर दुसर्‍याने म्हटले की, “अरबाजला काढा, निक्की वीक होईल आणि एकटी पडेल, तिची मनमानीपण चालणार नाही”. आणखी एकाने लिहिलंय, “भावांनो आपल्याला अरबाजला बाहेर काढायचं आहे, सुरज, वर्षा ताई, जान्हवी याना वोट करा. अरबाज वोटींगमध्ये सगळ्यात शेवटी आहे, पण बिग बॉस त्याला बाहेर काढणार नाहीत. वोटिंग फक्त नावाला घेतात. बिग बॉसला जे वाटतं तेच ते करतात. बघू यावेळी काय करतायेत”, असं म्हणत एका नेटकाऱ्याने शंका व्यक्त केली आहे.

Raj Thackeray Vision Worli: काळीपिवळी टॅक्सी बघितली की हे शहर म्हणजे ‘मुंबई’ हे कळायचं, पण आता…काय म्हणाले Raj Thackeray?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version