अभिनेत्री Ileana D’Cruz च्या बाळाचा बाप कोण? फोटो झाले व्हायरल,म्हणाली …

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रुझ सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. इलियाना सध्या प्रेगनन्ट (pregnant) असून तिच्या या प्रेग्नेंसीची (Pregnancy) सध्या सर्वत्र फार चर्चा होत आहे.

अभिनेत्री Ileana D’Cruz च्या बाळाचा बाप कोण? फोटो झाले व्हायरल,म्हणाली …

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रुझ सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. इलियाना सध्या प्रेगनन्ट (pregnant) असून तिच्या या प्रेग्नेंसीची (Pregnancy) सध्या सर्वत्र फार चर्चा होत आहे. इलियाना सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. इलियानाने सोशल मीडियावर आपल्या प्रेगनन्सीची (Pregnancy) बातमी चाहत्यांना दिली होती. पण तिचे लग्न न झाल्याने या बाळाचा बाप कोण असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांद्वारे तिला करण्यात आले. पण इलियानाने यावर कधीही कोणते भाष्य केले नाही.

त्यातच आता इलियाना डिक्रुझ हिने आपल्या होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण तो नक्की कोण आहे, काय करतो, त्याचे नाव काय ? याबद्दल अभिनेत्रीने काहीही स्पष्ट केले नाही. अनेक दिवसांनंतर इलियाना हिने तिच्या बॉयफ्रेंडचा (boyfriend) फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर (Instagram story) फोटो शेअर करत अभिनेत्रीने ‘डेट नाईट’ (date night) असे लिहिले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इलियानाने जेव्हा आई होणार असल्याची घोषणा सोशल मीडियाद्वारे केली होती, तेव्हा अभिनेत्री कतरिना कैफच्या भावासोबत इलियाना हिच्या नात्याची चर्चा बरीच रंगली होती. दरम्यान आता इलियाना हिने बॉयफ्रेंडचा (boyfriend) फोटो पोस्ट केल्यामुळे सर्वच चर्चांना पूर्णविराम लागला आहे. सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्याचा आनंद घेत आहे आणि तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न अभिनेत्री करत आहे. लग्नाआधीच आई होत असल्याने इलियानाने ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. इलियाना ही बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. रणबीर कपूरच्या ‘बर्फी’ सिनेमाच्या माध्यमातून इलियानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सोशल मीडियावरही तिचे बरेचसे चाहतेवर्ग आहेत.

हे ही वाचा:

Hidden Forts In Pune,पावसाळ्यात या किल्ल्यांना भेट द्यायला विसरू नका

पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करु असा शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मानस

श्रावण अधिकमासात काय केले पाहिजे? सविस्तर वाचा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version