कपड्यांमुळे चित्रा वाघ यांच्या निशाणावर असलेली Uorfi Javed नक्की आहे तरी कोण ?

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात जणू काही सोशल मीडिया युद्धच सुरु असल्याचे दिसून येत आहे.

कपड्यांमुळे चित्रा वाघ यांच्या निशाणावर असलेली Uorfi Javed नक्की आहे तरी कोण ?

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) यांच्यात जणू काही सोशल मीडिया युद्धच सुरु असल्याचे दिसून येत आहे. चित्रा वाघ यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर त्या ट्वीटला उर्फीनं प्रत्युत्तर दिलं. पुन्हा मग चित्र वाघ यांनी पोलिसांना पत्र देत तक्रार दाखल केली पुन्हा एकदा उर्फीनं त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. आणि यांचा हा वाद आता इतका वाढत चालला आहे कि भाजपा नेत्या चित्रा वाघ या थेट इशारा देत म्हणाल्या आहेत ‘मला जर ती कुठे भेटली तर मी तिला थोबडीत मारेन’. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता या वादाला आणखी किती तोंड फुटेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. परंतु नेहमी तिच्या बोल्ड लुक मुळे आणि कपड्यांमुळे चर्चेत असणारी उर्फी नक्की आहे तरी कोण ?

उर्फी जावेद ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. उर्फीचा जन्म १५ ऑक्टोबर १९९६ रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरात झाला. उर्फी जावेदने तिचे शालेय शिक्षण लखनऊच्या सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून केले. यानंतर उर्फी जावेदने लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटीमधून मास कम्युनिकेशनमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. उर्फी जावेदला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती. तिला या क्षेत्रात करिअर करायचे होते. उर्फी जावेदने दिल्लीत फॅशन डिझायनर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ती दिल्लीत एका फॅशन डिझायनरची सहाय्यक म्हणून काम करायची. यानंतर उर्फी जावेद तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली.

अगदी लहान वयात उर्फी ही मुंबईत आली. २०१६ मध्ये तिला ‘बडे भैया की दुल्हनिया’ या मालिकेत अवनी पंत नावाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यानंतर, त्याच वर्षी तिला ‘चंद्र नंदिनी’ मालिका मिळाली ज्यामध्ये ती छायाच्या भूमिकेत दिसली. याशिवाय ‘मेरी दुर्गा’ या मालिकेतून तिला बरीच प्रसिद्धी मिळाली त्यामुळे ती घराघरात पोहचली. याशिवाय उर्फी बेपनाह, ये रिश्ता क्या कहलाता है आणि कसौटी जिंदगी की सारख्या मालिकांमध्ये देखील झळकली. २०२० मध्ये ती इतकी लोकप्रिय झाली की २०२१ मध्ये तिला बिग बॉस OTT मध्ये येण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं

उर्फी जावेद जोपर्यंत मालिकांमध्ये दिसत होती तोपर्यंत तिची ओळख मर्यादित होती. कारण की, तरुणाई या मालिकांपासून दूर राहणं पसंत करते, परंतु जेव्हा उर्फी बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये दिसली तेव्हा ती तरुणांमध्ये लोकप्रिय झाली. बिग बॉस ओटीटी द्वारे प्रसिद्धी मिळवणारी टीव्ही अभिनेत्री उर्फी दररोज चर्चेचा विषय बनते. विशेषतः तिच्या ड्रेसिंग सेन्सची आणि स्टाईल प्रेक्षकांच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर ती अनेकदा तिच्या अत्यंत विचित्र स्टाईलमुळे चर्चेत असते.

एका वेबसाइटनुसार, उर्फी जावेदची एकूण संपत्ती $1 मिलियनपेक्षा जास्त असू शकते. उर्फी जावेदच्या मालमत्तेबाबत आमच्याकडे कोणतीही माहिती नाही. मित्रांनो, कृपया सांगा की उर्फी जावेद अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकवेळा त्याला यासाठी ट्रोलही करण्यात आले आहे. उर्फी जावेदचे इन्स्टाग्रामवर १.५ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत.

हे ही वाचा:

Urfi Javed – Chitra Wagh वादात आता फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंची उडी; केले ‘या’ महिलांचे फोटो शेअर

Rishabh Pant साठी उर्वशी रौतेलाच्या आईने लिहिली पोस्ट, नेटकरी म्हणाले…

Urfi Javed चे चित्रा वाघ यांना आव्हान, मी आता तुरुंगात जाण्यास तयार आहे फक्त…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version