का घेणार Adipurusha चित्रपटाचे १०,००० तिकीट Ranbir Kapoor? जाणून घ्या कारण

सध्या अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनोनचा नवा चित्रपट "आदिपुरुष" हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट १६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहांमध्ये येणार आहे.

का घेणार Adipurusha चित्रपटाचे १०,००० तिकीट Ranbir Kapoor? जाणून घ्या कारण

सध्या अभिनेता प्रभास आणि क्रिती सेनोनचा नवा चित्रपट “आदिपुरुष” हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट १६ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहांमध्ये येणार आहे. रिलीजआधीच या चित्रपटाची प्रचंड चर्चा सुरु आहे त्याचबरोबर या चित्रपटाच्या प्रोमोला प्रेक्षकांनी भन्नाट प्रतिसाद दिला आहे. आदिपुरुष हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता परंतु आता या चित्रपटाची ऍडव्हान्स बुकिंग सुरु झाली आहे आणि प्रेक्षकांचा प्रतीसाद देखील वाढला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती समोर आली आहे की, बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) या चित्रपटाचे १०,००० तिकिटे विकत घेणार आहे. असे सांगण्यात आले आहे की अनाथ मुले आणि काही खास चाहत्यांना तो हा चित्रपट दाखवणार आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज होताच पहिल्याच दिवशी हा चित्रपट १०० कोटींची कमाई करू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. ६०० कोटींच्या अजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे आता आदिपुरुष हा चित्रपट किती कोटींचा गल्ला जमवले याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

या वर्षांमध्ये द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files), पठाण (Pathaan), द केरळ स्टोरी (The Kerala Story), आणि ‘जरा हटके जरा बचके’ (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटांनी मागील अनेक दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आदिपुरुष या चित्रपटाची एन्ट्री होताच हा चित्रपट या चित्रपटाचे विक्रम मोडेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘आदिपुरुष’ या सिनेमात प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेत आहे. तसेच सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मणाच्या भूमिकेत सनी सिंह आणि हनुमानच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे दिसणार आहे.

हे ही वाचा:

Sandipan Bhumre यांनी Chandrakant Khaire यांच्यावर केला सनसनाटी आरोप

Charu- Rajeev Sen यांचा झाला घटस्फोट, फोटो शेअर करत लिहिले…

RBI Governor Shaktikanta Das यांची केली मोठी घोषणा, कर्जाचा हप्ता वाढणार नाही…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version