Big Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या घरात आर्याची पुन्हा एन्ट्री होणार का? घरात येणार मोठा ट्विस्ट

कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली त्यानंतर आर्याने निक्कीला मी तुला मारिन असं म्हंटलं. त्यानंतर त्या दोघींमधील वादाचे रूपांतर हातापायीवर झाले. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारले.

Big Boss Marathi Season 5: बिग बॉसच्या घरात आर्याची पुन्हा एन्ट्री होणार का? घरात येणार मोठा ट्विस्ट

बिग बॉस मराठी सिझन ५ (Big Boss Marathi Season 5) हा रिऍलिटी शो मध्ये पहिलं एव्हिक्शन झालं आहे. बिग बॉसच्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्याप्रकरणी आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली त्यानंतर आर्याने निक्कीला मी तुला मारिन असं म्हंटलं. त्यानंतर त्या दोघींमधील वादाचे रूपांतर हातापायीवर झाले. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारले.

बिग बॉसच्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांनी आर्याच्या हिंसेचं समर्थन केलं नाही, तिला तिची चूक समजावण्याचा प्रयत्न केला. आर्याला समजावून सांगितल्यानंतर तिला तिची चूक समजली आणि तिने निक्की आणि बिग बॉससह महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागीतली. या सर्व प्रकारानंतर बिग बॉसने आर्याला जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसने अंतिम निर्णय जाहीर करत आर्याला घराबाहेर काढले.

बिग बॉस मराठीचे प्रेक्षक बिग बॉसच्या या निर्णयाच्या विरोधात आहेत. आर्या जाधवला घराबाहेर काढण्याच्या या निर्णयावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आर्या बिग बॉस घरातून बाहेर असली तरी तिची पुन्हा घरात एन्ट्री होऊ शकते याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आर्या रितेश भाऊंच्या स्टेजवर आली नाही. आर्या घरातून बाहेर पडताना तिला दाखवण्यात देखील आलेले नाही. दुसरं कारण असे असू शकते की, बिग बॉसच्या घरात अजूनही आर्याच्या नावाची पाटी आहे, त्यामुळे आर्या पुन्हा बिग बॉसच्या घरात एन्ट्री करेल अशी प्रेक्षकांना आशा आहे. आणखी एक कारण असे असू शकते की, आर्या चुकली असली तरी संपूर्ण महाराष्ट्र्र आर्याला सपोर्ट करताना दिसत आहेत. त्यामुळे आता बिग बॉस प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करून आर्याला पुन्हा घरात एन्ट्री देणार का ? याकडे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचे लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा:

सीबीटीसी यंत्रणेमुळे प्रवाशांना दिलासा; दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन धावणार गणपती विसर्जननिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल, १७ रस्ते वाहतुकीस बंद

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version