जॉली एलएलबी 3 मध्ये दोन्ही ‘जॉली’ येणार आमने – सामने?

सुभाष कपूर यांच्या या नव्या सिनेमात अर्शद वारसी आणि अक्षय कुमार या दोघांचा युक्तिवाद प्रेक्षकांना पाहता येणार

जॉली एलएलबी 3 मध्ये दोन्ही ‘जॉली’ येणार आमने  – सामने?

जॉली एलएलबी 3

जॉली एलएलबी(Jolly LLB) बॉलिवूडमधील गाजलेल्या काही सिनेमांपैकी एक सिनेमा. आतापर्यंत या सिनेमाचे दोन भाग प्रदर्शित करण्यात आले आहेत. या दोन्ही सिनेमांनी भारतातील न्यायव्यवस्था आणि त्याच्यामधील त्रुटींवर भाष्य केले आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागात अर्शद वारसी दिसला होता. तर जॉली एलएलबी सिनेमाच्या सिक्वेलमध्ये अक्षय कुमारने काम केले होते. हे दोन्ही सिनेमे बॉक्सऑफिसवर चांगलेच हिट ठरले होते. पण, आता सर्वत्र चर्चा सुरु आहे ती ‘जॉली एलएलबी 3’ (Jolly LLB 3) ची. सुभाष कपूर (Subhash Kapoor) यांच्या या नव्या सिनेमात अर्शद वारसी आणि अक्षय कुमार या दोघांचा युक्तिवाद प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सदाबहार सौरभ शुक्ला न्यायाधीशाच्या भूमिकेत झळकतील.

हृतिक रोशन आणि सैफ अली खानची जोडी घेऊन येणार थ्रिलर सोबत ॲक्शनचा धमाका

जॉली एलएलबीमध्ये अर्शद वारसी(Arshad Warasi) हिट अँड रन केस लढताना दिसला होता, तर जॉली एलएलबी 2 मध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) एका बनावट चकमक प्रकरणाची वकिली करताना दिसला होता. आता असही बोललं जात आहे कि या सिनेमाचा नवा भाग लवकरच प्रदर्शित होईल आणि अशाच एका जबरदस्त कथानकासह आणि दिग्दर्शनासह हा सिनेमा प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा मनोरंजनाची मेजवानी ठरेल. तसेच सिनेमाबाबतची हि अपडेट व्हायरल होटाच सोशल मीडियावर देखील विनोदी मिम्सचा पाऊस पडत आहे.

पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्याकडे अशी एक कल्पना आहे, ज्यामध्ये ते या दोन अभिनेत्यांमध्ये टक्कर देण्यास तयार आहेत. मात्र, मागील दोन चित्रपटांप्रमाणेच तिसऱ्या चित्रपटालाही जज अभिनेता सौरभ शुक्ला (Saurabh Shukla) असणार आहे. सूत्रांवर विश्वास ठेवला तर, ही नवीन स्क्रिप्ट खूपच मजेदार आहे आणि हा तिसरा चित्रपट दोन चित्रपटांपेक्षाही मोठा असेल. यापूर्वी, अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अर्शद वारसी (Arshad Warasi) नुकतेच ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात एकत्र दिसले आहेत.

जॉली एलएलबी व्यतिरिक्त, अक्षय कुमार सध्या कॅप्सूल गिल, बडे मिया छोटे मिया, मुदस्सर अझीझ यांच्या आगामी कॉमेडी चित्रपटावर काम करत आहे. अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘कटपुतली’ लवकरच OTT वर रिलीज होणार आहे.

हे ही वाचा:

फेसबुक अकाउंट हॅक झाले की बग? वापरकर्त्यांनी केल्या न्यूज फीड सेलिब्रिटी पोस्टसह स्पॅम झाल्याच्या तक्रारी

जेम्स कॅमेरूनचा ‘अवतार’ चित्रपट पुन्हा परतणार थिएटरमध्ये; नवीन ट्रेलर झाला रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version