Rakhi Sawant घरातल्या प्रॉपर्टीचे नुकसान केल्यामुळे बिग बॉस राखी सावंत दाखवतील का बाहेरच्या रस्ता?

Rakhi Sawant घरातल्या प्रॉपर्टीचे नुकसान केल्यामुळे बिग बॉस राखी सावंत दाखवतील का बाहेरच्या रस्ता?

‘एंटरटेंनमेंट क्वीन’ आणि ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत सतत चर्चेत असते. कोणत्या न कोणत्या कारणामुळे ती प्रसिद्धी झोतात येत असते. सोशल मीडियावर राखीचे अनेक फनी व्हिडीओ, रस्त्यावरचा डान्स, वादग्रस्त वक्तव्य व्हायरल होत असतात. आता सद्या राखी कलर्स मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध रियालिटी शो ‘बिग बॉस मराठी’ पर्व ४ या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून खेळताना दिसत आहे. राखी तिच्या अतरंगी स्वभावामुळे बिग बॉस घरात देखील अतरंगी किस्से करत आहे.

हेही वाचा : 

Mamta Kulkarni अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या ‘या’ याचिके संदर्भातील कागतपत्रे पुन्हा बनवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

नुकतच राखी सावंत आणि अपूर्वा नेमळेकर यांचे घरात जोरदार भांडण झालं. या भांडणात राखी इतकी प्रचंड संतापली होती, की तिने घरातली भांडी फोडली. फक्त तिची एक कॉफी न मिळाल्याने तिला तिचा राग अनावर झाला. पण आता ही भांडी फोडणं तिला चांगलंच महागात पडलं आहे.

घरातील सदस्यांनी तिची कॉफी लपवल्याचा तिला संशय होता. “मला माझी कॉफी द्या” असं म्हणत तिने अपूर्वा नेमळेकरशी कडाक्याचं भांडण केलं. इतकच नाही तर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. इतकच नाही तर राखी सावंत अक्षय केळकरच्या अंगावरही धावून गेली. संतापाच्या भरात तिने स्वयंपाक घरातली भांडी फोडली. राखीचा हे वागणं पाहून घरातली इतर सर्वच सदस्य तिच्या विरोधात गेले आणि त्यांनी तिच्या या वागण्याचा निषेध नोंदवला. आता बिग बॉस राखी सावंतच्या या वर्तवणुकीवर कोणती एक्शन घेणार हे येत्या भागातच कळेल.

Asaduddin Owaisi असुद्दीन ओवेसींनी भारत-चीन वादावरून केंद्रावर ताशेरे ओढत म्हणाले, भारताकडे चांगले सैनिकी बळ आहे पण पंतप्रधान…

राखीचा अभिनय क्षेत्रातील प्रवास

१९९७ मध्ये राखीला ‘अग्निचक्र’ हा चित्रपट मिळाला, ज्यासाठी तिनं तिचं नाव बदलून रुही सावंत ठेवलं. यानंतर तिनं ‘जोरू का गुलाम’, ‘जिस देश में गंगा रहता है’मध्ये काम केलं. त्यानंतर राखीने ‘नच बलिये’मध्ये परफॉर्म केले. २००३ मध्ये तिने ‘चुरा लिया है तुमने’ चित्रपटातील आयटम नंबरसाठी ऑडिशन दिले होते. राखीने या आयटम नंबरसाठी चार वेळा ऑडिशन दिले होते आणि नंतर तिचं सिलेक्शन झालं. २००३ मध्ये, जेव्हा राखीने ‘मोहब्बत है मिर्ची’ मधून तिचा डान्स दाखवला तेव्हा तिला लोकांनी पसंती दिली. हिमेश रेशमियानं हे गाणे संगीतबद्ध केलं होतं. यानंतर राखीला चित्रपटांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका मिळू लागल्या. २००५ मध्ये ती ‘परदेसिया’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आणि हे गाणंही हिट झालं.

मुंबई पोलिसांकडून सोमय्या पिता पुत्रांना मोठा दिलासा

Exit mobile version