spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आलिया पाठोपाठ रणबीर करणार का हॉलिवूडमध्ये पदार्पण?

बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir kapoor) गेल्या काही दिवसांपासून 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) आणि 'शमशेरा' (Shamshera) या सिनेमांमुळे चर्चेत आहे.

Ranbir Kapoor On Hollywood : बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir kapoor) गेल्या काही दिवसांपासून ‘ब्रम्हास्त्र’ (Brahmastra) आणि ‘शमशेरा’ (Shamshera) या सिनेमांमुळे चर्चेत आहे. ‘शमशेरा’च्या माध्यमातून रणबीरने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. तर दुसरीकडे ‘ब्रम्हास्त्र’ हा सुपरहिट सिनेमा ठरला. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश होतो. रणबीर कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. रणबीरच्या ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली. या चित्रपटात पहिल्यांदाच तो पत्नी आलिया भट्ट बरोबर झळकला होता. रणबीरकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये तो झळकणार अशी चर्चा आहे.

बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनिल कपूरपर्यंत या कलाकारांनी हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रणबीरने नुकतचं ‘रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (Red Sea International Film Festival) रणबीरने हॉलिवूड पदार्पणासंदर्भात (Ranbir Kapoor On Hollywood) भाष्य केलं आहे. या महोत्सवादरम्यान रणबीर कपूर भरभरून बोलला आहे. या महोत्सवात रणबीरला हॉलिवूड पदार्पणासंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, “मला नेहमीच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात रस होता मात्र वास्तवात मी एक चांगला लेखक नसल्याने मी हे धाडस करू शकत नाही. मी लेखक नाही तसेच माझ्या कल्पना माझे विचार मला इतरांच्या बरोबर शेअर करताना थोडे लाजल्यासारखे होते. यावर मी काम करत आहे. मला लवकरच दिग्दर्शन सुरु करायचे आहे तसेच त्यात अभिनयदेखील करायचा आहे.”

‘रेड सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ रणबीर कपूर चर्चेत होता. या महोत्सवात रणबीरला हॉलिवूड पदार्पणासंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, हॉलिवूड पदार्पणासंदर्भात भाष्य करताना रणबीर म्हणाला,”मी माझ्या भाषेत काम करायला पसंती दर्शवतो. तसेच मला सध्या बॉलिवूडमध्येच चांगल्या संधी मिळत आहेत”.

रणबीर पुढे म्हणाला,”बॉलिवूडमध्ये मिळणाऱ्या चांगल्या संधीचा मी स्वीकार करतो. माझी सध्या तरी हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा नाही”. हॉलिवूडमध्ये काम करण्याचं रणबीरने स्पष्ट केलं असलं तरी दुसरीकडे मात्र रणबीरची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) ‘द हार्ट ऑफ स्टोन’ (The Heart of Stone) हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

 रणबीरचा बहुचर्चित ‘अँनिमल’ (Animal) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच त्याने अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.

हे ही वाचा : 

Gujarat- Himachal Election Result 2022 गुजरातमध्ये विजय पक्का, तर हिमाचलमध्ये भाजपला मोठा धक्का, कोण मारणार बाजी?

Gujarat Election Result गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांकडून विजयी पताका

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss