spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कोकण हार्टेड गर्ल करणार का मनसेत प्रवेश ? अंकिता वालावलकर म्हणाली…

सध्या मराठी कलाकारांचा (Marathi artists) राजकारणाकडे (politics) कल वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी कलाकरांनी राजकीय पक्षात प्रवेश केला आहे.

सध्या मराठी कलाकारांचा (Marathi artists) राजकारणाकडे (politics) कल वाढला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक मराठी कलाकरांनी राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. त्यात कालच अभिनेता अभिजीत केळकर (Abhijit Kelkar) याने देखील भाजपात (BJP) प्रवेश केला. आता त्यातच आणखी एका कलाकाराने राजकारणात येण्याबद्दल हिंट दिली आहे. ती कलाकार म्हणजे अंकिता वालावलकर (Ankita Valawalkar).

अंकिता वालावलकर ही कोकण हार्टेड गर्ल (Konkan Hearted Girl) म्हणून प्रसिद्ध आहे. अंकिताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. अंकिता यु ट्यूबवर (YouTube) सुद्धा सक्रिय असते. अंकिताचे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतात. तिने केवळ रील स्टार (Reel star) म्हणून लोकप्रियता मिळवलेली नाही तर तिने तिच्या बऱ्याच व्हिडिओतून सामाजासाठी काही तरी करण्याचा प्रयत्न देखील करत असते. तिचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता अंकिता देखील राजकारणात येण्याचा विचार करतेय असं तिच्या वक्तव्यावरुन दिसतयं. अंकिता वालावलकरने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या राजकारणातील एंट्री बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती म्हणाली, “पहिल्यापासून राजकारणातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) मला फार आवडायचे. त्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) हे व्यक्तीमत्व आवडायचं कल असं नाही म्हणता येणार पण आपल्याला कळत ना कोण चांगलं काम करत आणि स्पष्ट बोलतयं मी पहिल्यांदा त्यांच्या घरी गेले त्यामुळे त्यांच्या पक्षाशी जास्त संबंध आला.”

“पण असं काही नाही की पक्षाकडे जाण्याचा काही विचार होता पण असं वाटलं की माझ्यामुळे कुणाचं भलं होत असेल आणि चांगली संधी आहे. तर मी तिथे उभी राहते मग मी पक्ष किंवा व्यक्ती पहात नाही तिथे उभी राहते.” थोडक्यात अंकिता वालावलकरने अद्याप ती राजकारणात येणार असल्याचं सांगितलं नाही. मात्र, चांगली संधी मिळाली आणि तिला ते गरजेच वाटलं तर ती नक्कीच राजकारणात येईल. यावेळी तिने ती राज ठाकरे यांच्या मनसेत जाईल अशी हिंट दिली आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी तिचं कौतुक करत आहे. यावर्षी मार्च महिन्यात अंकिता वालावलकरने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अंकिता वालावलकरबरोबर इतरही क्रिएटर्स (Creators) होते.

हे ही वाचा: 

१८ ते २२ सप्टेंबर या कालवधीत संसदेचं एक विशेष अधिवेशन…

OCCRP च्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठा बदल …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss